Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन केंद्राच्या वतीने नवसंशोधकांना संधी व सहभागी होण्यासाठी आवाहन : प्रा.डॉ.एम. एस.देशमुख

 

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य अर्थात  रीतसर स्थापना करण्यात आले असून या केंद्राद्वारे नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या संशोधकाचे अधिकार अबाधित ठेवून संशोधकाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

          पुरातन काळापासून मानवी जीवनातील अमूलाग्र बदल हे साध्या व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून घडत गेले आहेत. चाकाचा आविष्कार असो किंवा ऊर्जा समीकरण, प्रत्येक महान नवकल्पनेमध्ये साधेपणा होता. प्रत्येक माणसात- तो सामान्य असो किंवा शास्त्रज्ञ-त्यांच्या कल्पनेत नावीन्यपूर्णता असते. काही लोक आपल्या संशोधनाद्वारे या नाविन्यपूर्णतेला मूर्त स्वरुप देतात. शिवाजी विद्यापीठ अशा सामान्यांतील नाविन्यपूर्ण संशोधकांना आमंत्रित करत आहे. अशा नवकल्पनांचे संगोपन करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याचा शिवाजी विद्यापीठाचा मानस आहे. 

         यासाठी शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्राच्या अंतर्गत या सेक्शन आठ कंपनी कायदा 2013 नुसार रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना ज्या टप्प्यावर (उदा.कल्पना, प्रक्रिया, नमुना) आहेत त्या आमच्यापर्यंत पोहचवा. या केंद्रामार्फत आम्ही त्याला योग्य व्यासपीठ मिळेल याची खात्री देतो. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे अधिकार अबाधित राहतील व त्याची गोपनीयता सांभाळली जाईल. सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जाईल तसेच काही दर्जेदार व निवडक प्रकल्पांना रोख बक्षिस दिले जाईल. ज्या प्रभावी, कार्यक्षम कल्पना असतील अशा कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. यासाठी संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेशी संपर्क साधावा किंवा sciil@unishivaji.ac.in या इमेल वर आपल्या संकल्पना पाठवण्यात याव्यात असे आवाहन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांचेकडून करण्यात येत आहे.

      शिवाजी विद्यापीठाच्या या केंद्राचा हा उपक्रम स्तुत्य असून नाविन्य घडविणारा व नवसंशोधकाला प्रेरणा व संधी देणार आहे.

 

सहभागी होण्यासाठी 👇

रजिस्ट्रेशन लिंक -  https://forms.gle/8rGqSWdCuSbPfprGA


अधिक माहितीसाठी संपर्क:-👇 

श्री.सुधीर देसाई -  9673748181, 

डॉ.वैशाली भोसले  - 942258271,  

डॉ.अजित कोळेकर -9423041945, 

कार्यालय संपर्क क्र. : 0231-2609087

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा