Breaking

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

कोथळी येथे भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ



जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


  कोथळी येथे विद्यमान सरपंच ऋषभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास चांगला  प्रतिसाद मिळत गावातील प्रत्येक तरुण वर्गाने,प्रत्येक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत हे रक्तदान शिबिर पार पाडले.

      सद्यस्थितीमध्ये लागणारे रक्ताची गरज ओळखून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोरोनाच्या काळामध्ये होणाऱ्या रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असे उद्गार सरपंच पाटील यांनी काढले. यावेळी सरपंच ऋषभ पाटील यांचा वाढदिवस साजरा करत मा. खासदार राजू शेट्टी यांनी सरपंच ऋषभ पाटील यांना केक भरवित त्यांच्या कामाचे कौतुक करून इथून पुढे असेच काम करावे असे शुभेच्छा दिल्या.

        यावेळी लोकवर्गणीतून साकारलेल्या कोथळी येथील कोविंड सेंटर मधील सेविकांचा व आशा सेविका यांचा कोविंड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व वायरमन यांना कोविंड योद्धा म्हणून गौरवण्यात आले.

         सदर कार्यक्रमास जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्ष संजय पाटील माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पंचायत समितीचे उपसभापती राजगोंडा पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत केंबले, उद्योगपती हंकारे, उपसरपंच आकाराम धनगर यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मा.सरपंच पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना युद्धांचे सत्कार ठेवून एक अनोखा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल गावांमध्ये समाधानाची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा