Breaking

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

जयसिंगपूरच्या लाल बावटा कामगार युनियनने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले मागण्यांचे निवेदन

 

लाल बावटा युनियनने दिले निवेदन : नामदार हसन मुश्रीफ

नेहा राठोर :  विशेष प्रतिनिधी


   जयसिंगपूर शहरामध्ये तंबाखू उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. या महिला कामगार जणगड तंबाखूपासून सर्व प्रकारच्या तंबाखू जर्दा आणि विडीसाठी लागणारा तंबाखू तयार कण्याचे काम करतात. तंबाखू गोडावूनमध्ये काम करीत असताना तबाखूचा यस नाकातोडावाटे शरीरात जाऊन त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या उदयोगात तंबाखू कामगाराणा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही सोयी सवलती मिळत नाहीत. प्रचंड महागाई वाढली असल्याने सध्याच्या पगारामध्ये जीवन जगणे असहय झाले आहे.

   विडी उदयोगातील कामगाराप्रमाणे या महिला कामगारांना प्रॉव्हीडड फंड, ग्रॅच्युएटी, विमा इ. सवलती मिळत नाहीत. तंबाखू प्रोसेस शिवाय विडी तयार होत नाही. विडी कामगारांणा सर्व कामगार कायदे लागू आहेत. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त अपायकारक व धोकादायक काम असुनही तबाखु प्रोसेस मधील कामगारांना कोणत्याही सवलती मिळत नाहीत. या महिला कामगारांना माथाडी धरतीवर सर्व फायदे मिळणे आवश्यक आहे. परंतु

    कोणतेही फायदे मिळत नाहीत. विडी उदयोगातील कायदे या सर्व महिला कामगारांना कायदे लागू करावेत. या तंबाखू उद्योगामध्ये नवीन कामगार येत नाहीत. दि. १३ जुलै २०१० रोजी अधिसूचनेव्दारे मूळ पगार ३७००/- रुपये महागाई भत्ता २२६२/- असे एकूण ५९६२/- रुपये किमान वेतन निश्चीत केले आहे. त्याचीही अंमलबजावणी होत नाही. म्हणून खालील मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.


१) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे १८०००/- रुपये पगार मिळावा.

 २) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाप्रमाणे सर्वकश कायदा करावा याची नोंद करावी. 

३) किमान वेतन कायदयाची पुर्नरचना करावी.

    निवेदनात दिलेल्या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा