दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगाद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), NIA, SSF आणि आसाम रायफल्समध्ये एकूण 25 हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे.
यासाठी संगणक आधारित परीक्षेच्या (CBE) तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. 7 सप्टेंबर रोजी एसएससीने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान ही परीक्षा आयोजित केली जाईल. 31 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या 25 हजार 271 कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे
तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता
देशातील कोरोना महामारीची सध्याची परिस्थिती पाहता आणि वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या सरकारी मार्गदर्शक नियमांमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. काही कारणास्तव वारंवार होत असलेल्या बदलांमुळं SSC कडून उमेदवारांना नियमितपणे आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर परीक्षांच्या तारखाही जाहीर
SSC कडून कॉन्स्टेबल जीडी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याबरोबरच इतर विविध परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. एसएससीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2020 सीबीई (कॉम्प्युटर आधारित परीक्षा) माध्यमातून 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल उपनिरीक्षक भरती परीक्षा 2020 च्या दुसऱ्या टप्प्यातील पेपर 2 चे आयोजन 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. तसेच संयुक्त उच्च माध्यमिक (बारावी 10+2) स्तरीय परीक्षा 2019 ची कौशल्य चाचणी 3 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा