Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

शिरोळ पोलिसांनी उघडकीस आणला नांदणी येथील जनावर चोरीचा गुन्हा

 


प्रविणकुमार माने : उपसंपादक


    शिरोळ पोलिसांनी पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांनी नांदणी येथील चोरीस गेलेल्या जनावरांची चोरी उघडकीस आणली.

     शिरोळ पोलीस ठाण्यात जनावर चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपी १)दिलीप अरुण शेंडे व.व.२६,२) तुषार शामराव कांबळे व. व.२० वर्ष,३)शितल राजेंद्र कांबळे वय २७ वर्ष, ४) योगेश किरण कांबळे वय २४ वर्षे ५) अक्षय सुनील चाणक्य वय व. २६ वर्षे, ६) एक विधिसंघर्षग्रस्त बालक सर्व रा. हुपरी  यांचे पि.सी. रिमाड दरम्यान त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आला. त्यानुसार चोरी उघडकीस आली.

     नमूद आरोपींपैकी आरोपी  १)तुषार शामराव कांबळे २) शितल राजेंद्र कांबळे व ३) विधिसंघर्षग्रस्त बालक याच्याकडून गुन्हे उघडकीस आणताना हातकणंगले पोलिस स्टेशन कडील ही खालील गुन्हे 

१) हातकणंगले पोलीस स्टेशन

1. गु.र.नं.  452/21 कलम 457, 380  भा.द.वि.

2. गु.र.नं.  457/21 कलम 379 भादवि हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेली अशोक लेलँड मिनी ट्रक हस्तगत करण्यात आली आहे.

      शिरोळ पोलिसांनी पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे सर्व टीमची कामगिरी कौतुकास्पद असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा