तीन वर्षीय बालकाला डोळ्याचा कॅन्सर |
आदिनाथ पाटील : अकिवाट प्रतिनिधी
सैनिक टाकळी येथील रिक्षाचालक प्रदीप कोळी यांचा 3 वर्षाचा मुलगा पृथ्वीराज याला डोळ्याच्या कॅन्सरने घेरलय. पण गरीब परस्थिती असलेल्या प्रदीप यांना डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी 5 लाख खर्च सांगितल्यामुळे प्रदीप यांना आपल्या मुलाचे डोळे वाचवण्यासाठी मदतीची गरज आहे .त्यामुळे आपत्ती काळात मदतरुपी निधी गोळा करणारी KITTO ही संस्था पूढे सरसावून पृथ्वीराजच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या संस्थेने पृथ्वीराजचा त्याच्या कुटुंबाबरोबर व्हिडीओ बनवून मदतीची विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वी पृथ्वीराजला दिसायला अडचणी येऊ लागल्या. काही दिवसानंतर त्याच्या डोळा लालसर होऊ लागला व तो भाग फुगू लागला. त्याला कॅन्सर झाल्याचे कळताचं कुटूंबावर दुःखाच डोंगर कोसळलं. परिसरातून पृथ्वीराज आणि कुटूंबाला सहाभूती मिळत आहे. काही लोकांनी पूढे सरसावून मदतही केली आहे.
तुम्ही ही खालील माहिती घेऊन मदत करू शकता
प्रदीप वसंत कोळी, सैनिक टाकळी, शिरोळ तालुका
Bank of india, kurundwad
AC No, 091810110004575
IFSC cod, BKID0000918
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा