Breaking

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

सामाजिक कार्यकर्ते विपुल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 

जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या


जीवन आवळे  : कोथळी प्रतिनिधी


   राजमाता जिजाऊ मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विपुल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दीन दुबळे व गरजवंत लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यामध्ये तांदूळ, साखर, तूर डाळ, मूग डाळ, शेंगदाणे, मसूर डाळ, यासह कडधान्य व चहा पावडर आधी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जयसिंगपूर मधील राजीव गांधी नगर येथे एकूण 13 कुटुंबियांना करण्यात आले. किमान एक महिना या कुटुंबांना पुरेल असा भरघोस जीवनावश्यक  वस्तूंच्या पुरवठा विपुल जगताप यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला.यावेळी लाभार्थ्यांनी विपुल जगताप यांचे आभार मानले.

या सर्व कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री बाहुबली भनाजे यांचे विशेष सहकार्य लाभले.

        सदर कार्यक्रमास रोहित पालकर, सुरेश ठाणेकर,बस्तवडे, लिंगाप्पा बेटी गिरी ,संदीप कोळी, अनुज भोसले, पवन वाघमोडे, सद्दाम पठाण,सुरज मगदूम,रमेश नायकोडी इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा