Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

जयसिंगपूर मध्ये संविधान दिनानिमित्त जयसिंगपूर कॉलेज NSS च्या वतीने संविधान जागर रॅलीचे आयोजन

 

संविधान दिनानिमित्त रॅली व क्रांती चौकात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

जीवन आवळे  : विशेष प्रतिनिधी


   जयसिंगपूर नगरपरिषद व भारतीय संविधान गौरव समिती यांच्यावतीने क्रांती चौकात आयोजित केलेल्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व संविधान रॅलीमध्ये जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी सक्रीयपणे सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे DYSP मा.रामेश्वर वैजने होते.

      शुक्रवार दि.२६ नोहेंबर रोजी,संविधान दिनानिमित्त , जयसिंगपूर कॉलेज ते क्रांती चौक  अशी  संविधान जागर रॅली काढण्यात आली. प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी संविधान जागर विषयीच्या घोषणा देत रॅलीला सुरुवात केली. सदर रॅली शिरोळ-वाडी रोड मार्गे क्रांती चौकात  आली. सदर ठिकाणी विविध शाळा व  महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

       सुरुवातीस संविधान गौरव समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर  DYSP मा.रामेश्वर वैजने यांच्यासमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांनी केले. त्यानंतर उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

      सदरच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी टिना गवळी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,आयोजक अमरदीप कांबळे व Adv. संभाजी नाईक,सर्व पत्रकार बंधु,प्रतिष्ठित नागरिक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात NSS कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.डी.खळदकर, उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम,उपप्राचार्य डॉ.सुनिल बनसोडे,डॉ.सौ.मनीषा काळे, डॉ.आर.डी.माने,प्रा.एस. व्ही.चौगुले, बाहुबली भनाजे, प्रा.मेहबूब मुजावर ,गणेश कुरले व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

1 टिप्पणी:

  1. नमस्कार माने सर,२६ नोव्हेंबर रोजी" सविधान दिन " निमित्त जयसिंगपूर कॉलेज ते क्रांती चौक आयोजित रॅली चे क्रांती चौकातील सामूहिक उद्देश पत्रिका वाचनानंतरचे काढलेले फोटो खूपच छान निघाले आहेत.धन्यवाद सर.

    उत्तर द्याहटवा