Breaking

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

सा रे पाटील स्मृती कथा स्पर्धेत भिलवडी येथील महादेव माने यांची 'भगदाड' कथा प्रथम

गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना

 

गणेश कुरले  : विशेष प्रतिनिधी


शिरोळ : मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग  यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा रे पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेत महादेव तुकाराम माने (भिलवडी) यांच्या 'भगदाड' कथेला प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक संतराम पाटील (केनवडे) यांच्या 'तिढा' कथेला मिळाला, या स्पर्धेत 78 कथा लेखकानी सहभाग घेतला होता,

      येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात कथा स्पर्धेतील विजेत्यांना दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र मुठाणे , साहित्य परिषदेचे जयसिंगपूर- शिरोळचे शाखाप्रमुख डॉ महावीर अक्कोळे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


         साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत केले, इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक प्रा डॉ मोहन पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात स्वर्गीय सा रे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन कथा स्पर्धेविषयी माहिती दिली.



           कथा स्पर्धेत तृतीय क्रमांक एकनाथ गायकवाड (मालवण) कथा- आपत्ती निवारण तसेच प्रा स्वाती कान्हेगावकर (नांदेड) कथा - समर्पण यांनी पटकाविला, उत्तेजनार्थ बक्षीस  वैशाली सरदार (पाडळी खुर्द ) यांच्या भ्रमाचा भोपळा,   महावीर कांबळे (इचलकरंजी) यांच्या मोर्चा तर सौ सविता पोतदार (कोयनानगर) यांच्या आई व्हावी, मुलगी माझी या कथेला देण्यात आले.

     दरम्यान, दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी आमदार स्वर्गीय सा रे पाटील यांनी सहकार क्षेत्रात निर्माण केलेल्या वैभवशाली कामाबरोबरच साहित्य चळवळीसाठी  योगदान दिले असून लेखक, कवी साहित्यिकांना लिहतं करण्याबरोबरच  साहित्य नवनिर्मितीला त्यांनी चालना देण्याचे काम केले असल्याचे मान्यवरांनी भाषणात सांगितले. 

     यावेळी ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे,सोशलिस्ट पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष साथी हसन देसाई, कवी उदय शिरोळकर, प्रा प्रकाश मेटकर , सचिन बनसोडे,खंडेराव हेरवाडे  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, पत्रकार दगडू माने यांनी सूत्रसंचालन केले, इंद्रधनुष्यचे व्यवस्थापक संजय सुतार यांनी आभार मानले,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा