Breaking

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

विभागीय स्पर्धेत जयसिंगपूरच्या 'घोडावत कन्या महाविद्यालयाच्या नम्रता कोळीला रौप्यपदक

 

विभागीय स्पर्धेत पदक मिळवल्याबद्दल विद्यार्थिनींच सत्कार


श्रुती चव्हाण : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर : राधानगरी महाविद्यालयाच्या संयोजनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या सिथेटीक ट्रॅकवर पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूरचा अथेलिट कु.नम्रता कोळी (बी.ए. भाग- २) हिने २८.५० मीटर भालाफेक करीत रौप्यपदक पटकावले कु. नम्रता ही जयसिंगपूर मधील नामवंत भालाफेकपटू असून यापूर्वी शालेय आणि संघटनेच्या अनेक स्पर्धेत पारितोषिके पटकावली असून आता ती विद्यापीठ आणि वरीष्ठ गटात मैदाने गाजवीत आहे. सांगली पोलिस सेवेत असलेले तिचे बंधू भालाफेकपटू मंगेश कोळी यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. दि. १६ से १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराड येथे होणा-या शिवाजी विद्यापीठ निवडीच्या आंतरविभागीय स्पर्धासाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. डी.सी.कर्णिक, जिमखाना प्रमुख प्रा. जे. एन. तांबोळी, प्रा. कुबेर पाटील यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

      याप्रसंगी जिमखाना समितीचे सदस्य प्रा. आर. एस. काकरंबे, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. डॉ. विकास मिणचेकर, प्रा. डॉ. पंडीत वाघमारे, प्रा. डॉ. सौ. माधुरी शिंदे, श्री. शितल भेंडवडे उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा