जयसिंगपूर कॉलेजमध्ये रसायनशास्त्राची सेट-नेट कार्यशाळा संपन्न |
*प्रा. चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या कार्यक्षेत्रातील कृतिप्रवण असणाऱ्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये एक दिवसीय सेट-नेट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व उद्घाटक शिवाजी विद्यापीठाचे नामवंत प्रो.डॉ.जी.एस. राशीनकर हे होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो.डॉ.मनिषा काळे या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये रसायनशास्त्र विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा.आर. डी. तासगावकर हे होते.
प्रो.डॉ. बाळासाहेब सरगर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करून प्रास्ताविक मध्ये या कार्यशाळेचे आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना म्हणाले, रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनी सेट-नेट परीक्षा कौशल्यपूर्ण अभ्यासाच्या माध्यमातून कमी काळात यशाची गुरुकिल्ली प्राप्त व्हावी हा होता.
डॉ.जी.एस.राशीनकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्रमुग्ध झालेले विद्यार्थी |
या कार्यशाळेतील प्रथम सत्राचे साधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध व रसायनशास्त्र मध्ये २० वेळा सेट-नेट पास होऊन रेकॉर्ड केलेले प्रो.डॉ.जी.एस. राशनकर हे होते.ते मार्गदर्शन करताना म्हणाले,CSIR व सेट-नेट परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. यानंतर अभ्यासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण करून जीवनातील कठीण परिस्थितीला कसं सामोरं जावं याबद्दल अचूक मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा कल हा विद्यार्थ्यांना प्रेरित करून लवकरात लवकर सेट-नेट परीक्षा पास होण्यासाठीचा होता. खूप वेळ चाललेल्या या सत्रामध्ये सेट परीक्षेचे उत्तीर्ण होण्याच्या क्लुप्त्या विशद करताना चित्रपटातील संवाद सांगून उत्साहित वातावरण निर्माण केलं होतं. त्यानंतर ते पुढे म्हणाले सेट-नेट पास होण्याची गुरुकिल्ली सांगताना नियोजन कसे करावे त्याची कार्यपद्धत कशी अनुसरावी याबाबत सखोल विवेचन केले. या विवेचनात सेट नेट पास होण्याची गुरुकिल्ली त्यांनी सांगितली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. आर.एस.ढब्बे हे होते. या कार्यशाळेत स्व:अनुभव कथन करून त्याने सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागेल याबाबत उचित मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात भौतिक व रसायनशास्त्रातील काही प्रश्न सोडवून विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या क्लुप्त्या सांगितल्या.
कार्यशाळेच्या अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉ. काळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या क्षेत्रात करियर घडविण्यासाठी सेट-नेट कार्यशाळेची नितांत आवश्यकता असते याच पार्श्वभूमीवर विभागाने आयोजित केलेली काल शाळा ही विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडणारी आहे. या कार्यशाळेच्या दोन्ही सत्राच्या अभ्यासपूर्ण विवेचनाच्या माध्यमातून सेट-नेट उत्तीर्ण होण्याचा शैक्षणिक यशस्वी मंत्र दिला.
या कार्यक्रमाचा आभार श्री.पाटील या विद्यार्थ्याने मानले.सदर कार्यशाळेच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. संदीप साबळे,प्रा.कबीर कुंभार,डॉ. कु.एस.जी.माने-गावडे,प्रा.कौसर आवटी,प्रा.कु.कोळी,प्रा.कु.पाटील व प्रा. चौगुले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करून यशस्वी होण्याबाबतचा विश्वास या माध्यमातून निर्माण झाला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा