उमळवाड येथे बैलगाडीच्या शर्यती |
*जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी*
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथील उमळवाड या गावामध्ये प्रथमच शर्यतीचा प्रारंभ झाला. अनेक वर्षातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी मुळे बैलगाडीच्या शर्यती होत नव्हत्या. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्या बाबत महविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडी मालक यांची भूमिका राज्य शासनाने प्रभावीपणे मांडली आणि काही अटी व शर्ती सह सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यती घेण्यासाठी परवानगी दिली.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मंगेशनगर (मंगोबा माळ) येथील मैदानावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. न्यायालयाची नियम अटी पाळून शर्यती पार पाडल्या. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी वेळोवेळी बैलगाडी मालक व शौकीन यांना नियमांचे पालन करून शर्यती पार पडण्यास सांगितले. सदर बैलगाडी शर्यती चा शुभारंभ व बक्षीस समारंभ आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलेल्या या शर्यती मध्ये जवळपास २ लाखांची बक्षिसे जाहीर केली होती. अतिशय रोमांचक अशा बैलगाडी शर्यती मध्ये "अ" गटातून निशिकांत बोंद्रे, हरिपूर यांच्या बैलगाडी प्रथम क्रमांक मानकरी ठरली. द्वितीय क्रमांक उमेश कोळेकर आरेवाडी व तृतीय क्रमांक सचिन मोरे जयसिंगपूर यांना मिळवला आहे.
त्याप्रमाणे बिनदाती बैलजोडी मध्ये प्रथम क्रमांक दिनकर चौधरी हरिपूर, दुतिय क्रमांक संदीप पाटील तासगाव तर तृतीय क्रमांक संदीप माने दानोळी यांच्या बैलगाडीने मिळविला आहे. बिना काठी व बिना लाठी या शर्यती पार पडल्यामुळे शर्यती प्रेमी मध्ये मोठा उत्साह होता. यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून किमान चाळीस हजारा पेक्षा अधिक बैलगाडी शर्यत प्रेमी यावेळी उपस्थित होते. शर्यती कमिटीचे प्रमुख विद्याधर कर्वे, पशुवैद्यक डॉ. शाम गोटखिंडे, सचिन भवरे, प्रभाकर चौगुले, रमेश चौगुले आणि नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या उमळवाड येथील कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले होते.
यावेळी जयसिंगपूर नगरीचे मा. उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, अजय पाटील-यड्रावकर मा.नगराध्यक्ष संभाजी मोरे, मा. नगरसेवक राहुल बंडगर जिल्हा सूत गिरणी संचालक प्रकाश लठ्ठे शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे, शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा