Breaking

रविवार, २० मार्च, २०२२

*मोबाईल स्टेटसवर आक्षेपार्ह मजकूर ठेवून दहशत माजविणाऱ्या विजय महादेव ढोपे याच्यावर जयसिंगपूर पोलिसांची कारवाई*


विजय महादेव ढोपे वय वर्ष ३२ रा. धरणगुत्ती


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर :  मोबाईल स्टेटस वर आक्षेपार्ह मजकूर ठेवून दहशत माजविणाऱ्या विजय महादेव ढोपे याच्यावर जयसिंगपूर पोलिसाकडून कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल स्टेटसवर हातात पिस्तूल घेतलेले चित्र आणि त्याखाली आक्षेपार्ह मजकूर ठेवून दहशत माजविणाऱ्या विजय महादेव ढोपे वय वर्ष ३२ रा. धरणगुत्ती ता.शिरोळ यांच्यावर जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

      त्याच्यावर यापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ७ ऑक्टोबर २०२१ रोजी तसेच चिपळून पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.ढोपे यांनी मोबाईल स्टेटस वर हातात पिस्तुल घेतलेला चित्राखाली 'ज्यांना वाटते आम्ही माघार घेतली तरी अजिबात काळजी करू नका वेळ आली की खेळ नक्की होणार' असा आक्षेपार्ह मजकूर लिहून सोशल मीडियावर दहशत माजविल्याचा संशय आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव यांनी रिपोर्ट केला आह. ढोपे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा संबंधाने सदर व्हाट्सअप स्टेटस ठेवला तर सांगितले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

     ढोपे याचे पैलवान या नावाचे शिरोळ।हद्दीत हॉटेल आहे. त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर येथे भारतीय दंड विधान कलम ३२६ व  ३५ सह भारतीय शस्त्र अधिनियम ४ व २५ कलम तसेच चिपळूण येथे २४१ /२०१७ कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्याच्या हातून एखादा शारीरिक गंभीर गुन्हा करण्याची शक्यता असल्याने कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा