Breaking

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

*सांगलीच्या विश्रामबाग परिसरात विठ्ठलनगर मध्ये चाकूचा धाक दाखवून चोरट्यानी दागिने पळविले*


सांगलीत महिलेचे दागिने पळवले


सांगली : विश्रामबाग परिसरातील विठ्ठलनगरमध्ये घरात प्रवेश करून तिघा चोरट्यांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून ३३ हजार रुपयांचे दागिने पळविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी फिर्यादी छाया सीताराम शिपूर (वय वर्ष ५१, रा. मोहिते मळा) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगरमधील मोहिते मळ्यात छाया शिपूर वास्तव्यास आहेत. त्या घरी एकट्याच असताना तिघे चोरटे मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरासमोर आले. खिडकीतून काठीने दरवाजाची कडी काढली. हॉलमध्ये आल्यानंतर तेथून स्वयंपाकघरात प्रवेश केला. संशयित चोरट्यांनी स्टीलच्या डब्यात ठेवलेली सोन्याची एक तोळ्याची बोरमाळ घेतली. त्यानंतर त्यांनी शिपूरे यांना  चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर चोरट्यानी टीव्हीवर ठेवलेला मोबाईल घेतला. छाया यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पलायन केले. या प्रकारामुळे छाया शिपूर खूप घाबरल्या होत्या. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिघा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

     या घटनेने सदर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा