Breaking

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

*अकिवाटच्या शिरपेचात मानाचा तुरा, अकिवाटच्या कन्येची सैनिक फेडरेशन च्या तालुका महिला अध्यक्ष पदी निवड*


सौ.रूपाली जुगळे यांची निवड


प्रा. अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी


अकिवाट : गावचे प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब शिरगांवे यांची कन्या सौ.रूपाली राकेश जुगळे रा. जयसिंगपूर यांची सामाजिक कार्याची दखल घेऊन सैनिक फेडरेशन, कोल्हापूर यांनी शिरोळ तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करून दिनांक २४ एप्रिल रोजी निवडीचे पत्र दिले.पती सैन्य दलातून निवृत्त झाल्या पासून त्या  सैनिक पत्नींसाठी समाजिक कार्य करण्यास सुरुवात केले. या निवडीमुळे अकिवाट व जयसिंगपूर परिसरातून जुगळे यांचे कौतुक होत आहे. महिला संघटनां कडून त्यांना शुभेच्छा दिले जात आहेत.  सौ. जुगळे या समाजिक कार्यात सतत अग्रेसर आहेत त्यांच्या समाजिक कार्याला योग्य पोहोच पावती देण्याचे कार्य सैनिक कल्याण बोर्डाने केल्याचे बोलले जात आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सौ. जुगळे या म्हणाल्या की पूर्वीप्रमाणे च  येथूनपुढे देखील्  माझे समाजकार्य चालुच राहील . 

    निवडीचे पत्र देतेवेळी सैनिक फेडरेशन चे पश्चिम महाराष्ट्र संघटक-विजय पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष-संजय माने, जिल्हा महिला अध्यक्षा-रेखा बनके, उपाध्यक्ष-कॅप्टन सदाशिव घेवडे, कार्याध्यक्ष-गणपतराव महाडिक, सेक्रेट्ररी- धनंजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा