भाषेचा जन्म झाल्यानंतर सतरा ( १७ ) खडी वापरली जायची,पण काळाच्या ओघात त्यातील काही वर्ण वर्णमालेतून निघून गेले आणि सध्या फक्त बाराखडीच शिल्लक राहिली, आणि याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी वाचन आणि लेखनात मागे राहिली.
श्री.विनायक हसबनीस
![]() |
श्री. विनायक हसबनीस |
![]() |
श्री. हसबनीस यांचे स्वागत करताना मध्यभागी प्राचार्य बी.पी. मरजे तर उजवीकडे प्रा.दयानंद बोंदर आणि डावीकडे प्रा. सुनील पाटील सर |
आज दिनांक २४ मे, मंगळवार रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन,सांगली येथे 'मराठी वर्णमालेची मूलतत्त्वे ' या विषयावर व्याख्यान/कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत श्री विनायक हसबनीस यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी बारा'खडी की सतरा'खडी ? वाचन कसे करावे, शुध्दलेखन कसे करावे, जोडाक्षरांची बाराखडी, अनुनासिके इत्यादी बद्दलचे मार्गदर्शन केले.
भाषेचा जन्म झाल्यानंतर सतरा ( १७ ) खडी वापरली जायची,पण काळाच्या ओघात त्यातील काही अक्षरे वर्णमालेतून निघून गेले आणि सध्या फक्त बाराखडीच शिल्लक राहिली, आणि याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी वाचन आणि लेखनात मागे राहिली. कारण बाराखडी शिकवताना राहिलेले वर्ण समोर नसतात, शिकवले जात नाहीत, मात्र पुस्तकात - लिखाणात याचा वापर झालेला असतो. त्यामुळे साहजिकच ते वर्ण समोर आल्यास विद्यार्थ्याला ते वाचता किंवा लिहिता येत नाही. असे मत श्री. हसबनीस यांनी व्यक्त केले.
बाराखडी - अ, आ,इ, ई,उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ. ( ॲ, ऑ हे दोन इग्रजी स्वर मिळून सध्या चौदा खडी )
सतराखडी - अ, आ,इ, ई,उ, ऊ, ऋ ,ॠ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अँ, ऑ, अं,अः
सोबतच श्री. हसबनीस यांनी जसे विज्ञानाच्या प्रयोगशाळा असतात तसेच भाषा प्रयोगशाळा ही प्रत्येक शाळेत सुरू करायला हव्या अशी इच्छा व्यक्त केली. त्याचसोबत श्रीमती पुतळाबेन शाह, बी.एड कॉलेजमध्ये अशी प्रयोगशाळा असल्याबद्दल प्राचार्य बी.पी मरजे आणि शिक्षकांचे कौतुकही केले.
श्री.विनायक हसबनीस यांचे शिक्षण एम. ए. बी.एड झाले असून त्यांनी १७ वर्षे सांगली शिक्षण संस्थेत सेवा केली आहे. सोबतच ते ३ वर्षे ' तुषार ' वार्षिकाचे संपादक होते. सध्या श्री. हसबनीस हे महात्मा गांधी विद्यामंदिर विटे येथे कार्यरत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी प्राचार्य बी.पी. मरजे होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दयानंद बोंदर यांनी केले होते तर प्रा.सुनील पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रथम वर्ष विद्यार्थिनी पद्मजा पाटील - मगदूम यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा