![]() |
प्रा. डॉ.डी.आर.भोसले मार्गदर्शन करताना |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
हुपरी : आपल्या देशात अनेक पुरोगामी संत महात्मे होऊन गेले. त्यापैकी संत कबीर एक महान संत होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील वाईट चालीरिती, ढोंगीपणा यावर कठोर प्रहार केले आणि समाजाचे प्रबोधन केले असे विचार हुपरी येथील चंद्राबाई शांता शेंडुरे महाविद्यालयातील उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. आर.भोसले यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
प्राध्यापक प्रबोधिनी मार्फत प्रत्येक महाविद्यालयात व्याख्याने आयोजित केली जातात. या व्याख्यानाचे पहिले पुष्प डॉ. भोसले यांनी गुंफले, संत कबीरांचे सामाजिक कार्य या विषयावर त्यांनी अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण भाषण दिले. संत कबीरांचो जीवन चरित्र त्यांनी उलघडून दाखविले. संत कबीरांच्या काळातील सामाजिक परिस्थीतीची माहीती देऊन त्या काळात कबीरांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य किती मोलाचे होते याची माहीती दिली.
डॉ. भोसले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की वाईट प्रथांचे आवलोकन करणाच्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आपल्या अभंग वाणीतून समजावले. समाजातील जाती भेद, धर्मभेद, उच्चनिच्चता, धार्मिक कट्टरता वाढ इत्यादीवर त्यांनी प्रहार केले, परमेश्वराच्या धर्माच्या नावावर समाजात कट्टरतावाद,द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या मध्ये दोहाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले. कामामालिन ढोंगी जातीयवाद्यांपासून दूर रहाण्याचा त्यांनी संदेश दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील,यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. जे.एस.इगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. एस सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा