![]() |
खून झालेला तरुण व गाडीची झालेली तोडफोड |
सांगलीच्या शंभर फुटी रोड वर असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय समोर असणाऱ्या अंडा बुर्जी सेंटर चालकाचा तिघा हल्लेखोरांनी भोसकून खून केला. संतोष बाबुराव पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून सदरची घटना आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली असून संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा