![]() |
संशयित आरोपी |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाणेत घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाच्या सतर्कतेमुळे २४ तासांच्या आत घरफोडी गुन्हेगारास अटक करून घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात सदर पथकाला इ यश प्राप्त झाले.
जयसिंगपूर पोलीस ठाणे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना ,पोलीस हवालदार बाबा पटेल, महिला पोलीस हवालदार अंजना बन्ने , स्मिता कांबळे,पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे व पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना , एक इसम आंबेडकर सोसायटी बौद्ध विहार जवळ संशयितरित्या फिरत असताना मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याची अंगझडती घेतले असता त्याच्याजवळ संशयितरित्या चोरीचे साहित्य मिळून आले. सदर संशयित इसमास नाव व गाव विचारले असता त्याचे नाव त्याने १) जहांगीर अब्दुल सय्यद (वय वर्ष ६० रा. कृष्णानगर, इचलकरंजी) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली आहे. लागलीच त्याला ताब्यात घेऊन यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मा. रामेश्वर वैजने , मा.पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघ,सहा. फौजदार कोरवी, सहा.फौजदार चळचूक, पोलीस हवालदार बाबा पटेल, महिला पोलीस हवालदार अंजना बन्ने,स्मिता कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन शेख, पोलीस कॉस्टेबल रोहित डावाळे, संदेश शेटे यांनी केली आहे.
जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या उत्तम कामगिरी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा