![]() |
जयसिंगपूर कॉलेजला स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२२ प्राप्त |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
*स्वच्छ भारत ; स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22*
जयसिंगपूर: जिल्हा परिषद, कोल्हापूर आयोजित 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' २०२१-२२, जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि.२१ जुलै २०२२ रोजी मा.संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.कोल्हापूर व मा.राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर व श्री.एकनाथ आंबोकर ,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्रीमती आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांतर्गत त्यांनी दिलेल्या निकषांमध्ये मार्च २०२२ मध्ये महाविद्यालयाची सर्व माहिती ऑनलाईन देऊन त्याचे फोटो पुराव्यासाठी देणे आवश्यक होते. मे २०२२ मध्ये दुसऱ्या तालुक्यातील नेमलेले नोडल अधिकारी प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन ऑनलाईन भरलेल्या माहितीची तपासणी करण्यात आली. या निकषांची पूर्तता करीत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कॉलेजला ११० पैकी १००.५ गुण प्राप्त झाले. त्यानुसार जयसिंगपूर कॉलेजने हे जिल्हास्तरीय फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त करून जिल्हा पातळीवर उत्तम कामगिरी करून दाखविली.
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची सुरुवात २०१६-१७ पासून भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने शाळांमध्ये स्वच्छता वाढल्यास एक चांगले वातावरण निर्माण होऊन आनंददायी व आरोग्यपूर्ण पिढी निर्माण होण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये या मोहिमेत प्रामुख्याने खालील सहा घटक व त्याचे गुण समाविष्ट होते. १)शुद्ध पाणी-२२ २) स्वच्छता-२७ ३) साबणाने स्वच्छ हात धुणे-१४ ४) सर्व स्वच्छतागृहाची देखभाल व दुरुस्ती-२१ ५) वर्तवणूक बदल व क्षमता विकास करणे-११ ६) कोविड-१९ ची सज्जता व प्रतिसाद-१५ असे सर्व मिळून ११० पैकी सर्वाधिक गुण प्राप्त ८ विद्यालय राष्ट्रीय स्तरावर, ३८ विद्यालये राज्य स्तरावर स्पर्धेत सहभाग होण्यासाठी निवडण्यात आले, तर १०० पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यालयांना फाईव्ह स्टार मानांकन देण्यात आले.
जयसिंगपूर कॉलेजच्या या उज्ज्वल यशात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.डॉ.सुभाष अडदंडे, सचिव मा.डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील व सर्व मान्यवर सदस्य, प्र.प्राचार्य प्रो.डॉ.एन.पी.सावंत, प्रो.डॉ.एम.व्ही.काळे, उपप्राचार्य सौ.एम.एस.पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. सदर कामी ऑनलाईन फॉर्म भरणे, फोटो घेणे तसेच निरनिराळ्या कागदपत्राची पूर्तता करणे या कार्यात पर्यवेक्षक श्री.बी.ए.आलदर, डॉ.एम.जे.बुरसे, श्री.एस.डी.चौगुले, श्री.बी.ए.पाटील, श्री.सुशांत पाटील, श्री.शितल पाटील, श्री.ए.जे.पवार तसेच कार्यालयीन अधिक्षक श्री.संजीव मगदूम, श्री.संजय चावरे यांचे सहकार्य मिळाले.
फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा