![]() |
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मळे व ग्रामस्थ |
नामदेव निर्मळे : टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी : दिनांक ३० जुलै,२०२२ रोजी टाकळीवाडी गावामध्ये फिरणारे दोन मोकाट बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. त्यातील एक बैल फार अशक्त व अंगावर जखमा झालेल्या होत्या.झुंज फार वेळ चालल्यामुळे एक बैल पूर्णपणे अशक्त होऊन खाली पडलेला होता .त्याला वैरण सुद्धा खाता येत नव्हते.अशा परिस्थितीत हा बैल होता.टाकळीचे पशुवैद्यकीय मा.श्री.विष्णू निर्मळे व टाकळीवाडी गावातील नागरिकांनी त्या बैलाला सलाईन ,ड्रेसिंग, करून एक जीवनदान दिले आहे.यावेळी टाकळीवाडीतील नागरिक संजय उन्हाळे, सुनील खोत, तेजस चिगरे,स्वप्निल चिगरे ,अमित उन्हाळे,अभिषेक कांबळे इत्यादी उपस्थित होते.
आता बैलाची स्थिती चांगली आहे .जरी पशुवैद्यकीय डॉक्टर साहेबांचे कर्तव्य असले तरी पण धाडस महत्त्वाचे आहे.बैल साधासुधा नसून अंगाने धिप्पाड आहेत.जखमी अवस्थेत असल्यामुळे हा बैल जमिनीवर पडून होता. बैलाला नवजीवन प्राप्त झाल आहे.गावात डॉक्टर विष्णू निर्मळे यांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा