![]() |
अल्ताफ गजर यांचा सत्कार करताना |
टाकळीवाडी प्रतिनिधी :. नामदेव निर्मळे
कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील रहिवाशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरायला गेले असता त्यांना रस्त्यात गंठण सापडली. सदर गंठण त्यांनी घेऊन घरी आले .
त्यानंतर संगीता नाईक हे आपले गंठण शोधत शोधत रस्त्याने रडत येत आहेत हे अल्ताफ गजर यांच्या लक्षात आले.त्याने काही न अपेक्षा ठेवता त्या गंठण ची ओळख पटल्यावर ते गंठण त्यांना परत केली. स्वार्थाने बरबटलेल्या या जगामध्ये अल्ताफ गजर यांच्या प्रामाणिकतेचं दर्शन झालं.
गावातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. अल्ताफ गजर यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सर्वत्र होत आहे.
खरं म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम विषारी मतभेद निर्माण करणारी व्यवस्था असताना अल्ताफ गजर सारख्या प्रामाणिक व्यक्तीने सदर गंठण परत देऊन माणुसकी दाखवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा