Breaking

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

*विद्यार्थ्यांनी ज्ञान व संस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्र पादाक्रांत केली पाहिजे : माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार*


मा.तानाजी पोवार व सत्कार मूर्ती

*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मी वडार महाराष्ट्राचा जयसिंगपूर विद्यार्थी गौरव समितीच्या वतीने जयसिंगपूर शहर वडार समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तुत्ववान समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष व संवेदनशील नेते मा. तानाजी पोवार व  मी वडार महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.अर्जुन देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.


        या समितीचे अध्यक्ष मा. सचिन मनोहर भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तुत्ववान समाज बांधवांचा यथोचित सन्मान करून त्यांना प्रेरणा देणे हा उदात्त हेतू सदर समितीचा असल्याबाबत त्यांनी सांगितले. यावेळी मी वडार महाराष्ट्राचा सरचिटणीस मा.श्री. तानाजी बाळू पोवार यांनी समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन समाजाच्या वतीने सन्मानपत्र व हनुमानाची मुर्ती देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. तानाजी पवार मार्गदर्शन करताना म्हणाले, मुळात वडार समाज हा निर्भिड समाज आहे. मात्र समाजातील काही घटकांमुळे हा समाज मूळ प्रवाहापासून दूर गेला. आज समाजाची अवस्था अत्यंत दयनीय असून आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. यासाठी समाज बांधव सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. या साठी शिक्षणाची कास धरून 'शिका,संघटित व्हा व संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचाराला आपलंसं करून 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेच्या माध्यमातून हे परिवर्तन करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी या व्यासपीठाचा वापर झाला पाहिजे. आज समाजातील विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश पाहता समाज परिवर्तनाची नांदीला सुरुवात झाली आहे हे त्यांनी या निमित्ताने नमूद केले.

       यावेळी मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष मा. अर्जुन देशमुख यांनी प्रतिपादन केले की, कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या समाजाचे रोजीरोटीचा साधन हे दगडाच्या खाणी असून त्या बंद आहेत अशावेळी आपल्या संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय यांना खाणी सुरू करण्याबाबतचे परवानगीचे निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांचा सर्वकष हित कसं होईल याचाही विचार या संघटनेच्या माध्यमातून होत आहे.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्षा सौ.अनुराधा आडके,माजी नगरसेवक महेश कलकुटगी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर सन्मान कर्तृत्वाचा - सन्मान समाजाच्या या अंतर्गत मा.श्री. विनायक शिंगाडे, सचिन डोंगरे, रमेश कलकुटगी,प्रा. परशुराम माने, राहुल शिंदे व शिवाजी पोवार या समाजबांधवांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व गुलाब देऊन  यथोचित सन्मान या समितीच्या वतीने करण्यात आला. 

     त्याचबरोबर १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शील्ड व गुलाब रोप देऊन सत्कार व कौतुक करण्यात आले.

      सदर कार्यक्रमात प्रा. परशुराम माने व मयुरी नलवडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे  नेटकं नियोजन मा.सचिन मनोहर भोसले ,मा. सुरेश शिंगाडे व मी वडार महाराष्ट्राचा पदाधिकाऱ्यांनी उत्तम पद्धतीन केले. या कार्यक्रमास शूरवीर तानाजी तरुण मंडळ व इतर वडार समाज तरुण मंडळाने सहकार्य केले. या कार्यक्रमास मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा संपर्कप्रमुख शंतनू पोवार, बाबुराव नलवडे हे मान्यवर उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी केले.

     मी वडार महाराष्ट्राचा जयसिंगपूर शहर आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा