Breaking

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

*अत्यंत संतापजनक ! वसई रेल्वे स्थानकात घडली थरारक घटना*


वसई रेल्वे स्थानकावर पतीने पत्नीला ढकलून केला खून


    मुंबईजवळ असलेल्या वसई रेल्वे स्थानकात थरारक घटना घडली असून पतीने पत्नीला धावत्या रेल्वेसमोर ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही भयानक व संतापजनक घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. या घटनेनंतर पतीने आपल्या दोन मुलांना उठवलं आणि त्यांना घेऊन तो फरार झाला आहे. सोमवारी पहाटेची ही घटना आहे.

     सदर पतीचं वय जवळपास ३० वर्षे असून मृत्यू झालेल्या पत्नीचं वय जवळपास २० वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.

    पोलिसांनी या प्रकरणी  तपास पथक नेमले असून आरोपी पतीचे शेवटचे लोकेशन हे कल्याणचे असल्याचे दाखवत आहे. कल्याणला तो लोकल ट्रेनमधून उतरल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी वसई जीआरपीमध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वसई रेल्वे स्थानका घडलेली ही हत्येची थरारक घटना सीसीटीव्ही टिपली गेली आहे. वसई रेल्व स्थानकात प्लटफॉर्म क्रमांक ५ वर आरोपीची पत्नी आपल्या दोन मुलांसह झोपली होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास एक ट्रेन वेगाने येत असल्याचे आरोपी पाहिले. यानंतर त्याने झोपलेल्या पत्नीला उठवले आणि प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्या जवळ नेले. भरधाव जाणाऱ्या अवध एक्स्प्रेससमोर तिला अचानक ढकलून दिले. ही घटना पहाटे ४ वाजून १० मिनिटांची आहे.

      पत्नीला रेल्वेसमोर ढकलून दिल्यानंतर आरोपी पतीने झोपलेल्या आपल्या दोन मुलांना उठवलं. यापैकी एका २ वर्षाच्या मुलाला हातात घेतलं. तर दुसऱ्या ५ वर्षाच्या मुलाला चालत घेऊन गेला. अवध एक्स्प्रेस वसई रोड स्टेशन वरून निघून गेल्यानंतरही तो पत्नीला पाहण्यासाठी थांबला नाही. जोडप्याचं नाव अद्याप कळलेलं नाही. पण आरोपीचा माग काढण्यात यश आलं आहे. आरोपी पती हा ट्रेनमध्ये चढला आणि तो दादरला उतरला. यानंतर तो दादरवरून कल्याण गेला. कल्याणला उतरल्यानंतर तो रिक्षाने गेला, अशी माहिती पश्चिम रेल्वे जीआरपीचे पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.

   या घटनेप्रकरणी अवध एक्स्प्रेसच्या चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने लोकांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा