Breaking

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

*नदीपात्रात अडकलेल्या वन्य बहिरी सासण्याला दिले जीवनदान

*

बहिरी सासण्याला दिले जीवदान


टाकळीवाडी प्रतिनिधी : नामदेव निर्मळे


          सैनिक टाकळी :  कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बहिरी ससाणा अडकलेला होता.तो सुटकेसाठी धडपडत होता.बराच काळ तो जाळीमध्ये अडकून होता .सैनिक टाकळीचे शेतकरी जयसिंग मारुती पाटील वय वर्ष ५० हे नदी पात्राजवळ गवत कापण्यासाठी गेले असता.त्यांच्या लक्षात ही बाब आली . 

           नदीपात्रात भरपूर पाण्याची पातळी वाढलेली असून जोराचा पाण्याचा प्रवाह चालू आहे. सध्या नदीपात्रात मगरीचा वावर आहे. अतिशय धाडसाने त्यांनी कार्य केले आहे.

      त्यांनी लगेच त्या वन प्राण्याची सुटका करून त्याला जीवनदान दिले.त्यांचे  सैनिक टाकळी गावामध्ये सर्वत्र  कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा