बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

*मातोश्री सोशल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त कोथळी च्या मंगेश नगरात वृक्षारोपण संपन्न*

 

वृक्षारोपण करताना सरपंच मा.भरतेश खवाटे


*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


कोथळी : मातोश्री सोशल फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मातोश्री सोशल फाउंडेशन कडून  विद्या मंदिर मंगेश नगर कोथळी येथे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कोथळी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक भरतेस खवाटे यांनी मातोश्री सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करीत ही संस्था  निस्वार्थपणे  कार्य करत असून गेल्या दोन वर्षांमध्ये समाज बहुउपयोगी उपकर्म व कार्यक्रम घेऊन उत्कृष्ट असे, काम करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. असे  उदगार काढून संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत  इथून पुढे सर्व उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी अशाच प्रकारचे सहकार्य लाभावे हीच सदिच्छा व्यक्त करत मान्यवरांचे आभार मानले.

            सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक कैलास राठोड ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, विजय खवाटे, अनमोल करे, राजेश विभुते मातोश्री सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष अर्जुनसिंग राजपूत, खजिनदार रमेश घाटके, सचिव सुशांत   चुडाप्पा, सदस्य किसन भोसले, उमेश पवार यासह मातोश्री सोशल फाउंडेशन संचलित, शाहू आर्मीचे ओंकार कोळी, अजय पाटील, झहीर खान मोकाशी, भोलू शर्मा, आकांक्षा शिरोळकर, श्रुती यादव, यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा