Breaking

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

टाकळी टाकळीवाडी कार्यक्षेत्रात लंपी आजारावरील लसीकरण जोमात

संग्रहित छायाचित्र 


टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

  तालुका:- शिरोळ टाकळी  येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू निर्मळे यांच्याद्वारे टाकळी व टाकळीवाडी कार्यक्षेत्रातील लंपी आजारावरील लसीकरण 70 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

डॉ.विष्णू निर्मळे 


   लसीकरण पूर्ण क्षमतेने उपलब्ध असल्यामुळे लसीकरण जोमात चालू आहे .टाकळी टाकळीवाडी कार्यक्षेत्रामध्ये 3500 जनावरे यांची संख्या आहे.

       आनंदाची गोष्ट की कार्यक्षेत्रात कोठेही मरतूक आढळून आलेली नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.  दोन दिवसात लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल.

   लंपी सदृश्य जनावर आढळल्यास डॉक्टर पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पशुपालकांचा लसीकरणासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे .विष्णू निर्मळे पूर्ण क्षमतेने आपली सेवा बजावत आहेत.काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा