Breaking

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

*सातारच्या महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त व्याख्यान संपन्न : अर्थ साक्षरता माणसाला सक्षम बनवते : प्रा. डॉ. सुभाष दगडे

 

मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.सुभाष दगडे ,प्राचार्य डॉ. शिवानंद मेनकुदळे ,प्रा डॉ. शिवाजी भोसले व डॉ. संजय धोंडे 


*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


प्राचार्य डॉ. शिवानंद मेनकुदळे

सातारा :  संबंध मानव जातीचा इतिहासात साक्षरतेचे महत्व सर्वाधिक असून त्यावरच विकासाची प्रक्रिया अवलंबून असते. बदलत्या काळाबरोबर ज्ञानक्षेत्र बदलत आहेत त्यामुळे त्या त्या क्षेत्रात व्यक्तीने साक्षर होणे गरजेचे आहे. अर्थसाक्षरता तर तिच्या जीवनातील व्यक्तीच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे." असे मत शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. सुभाष दगडे यांनी व्यक्त केले. 

     सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. 


        शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशनच्या वतीने विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयासंबंधीची विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प महिला महाविद्यालयात गुंफण्यात आले. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष व अर्थशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. एस. एम. भोसले , सुयेकचे कार्यवाह - खजिनदार डॉ. संजयकुमार धोंडे, उपाध्यक्ष प्रा. सौ. जे. ए. उथळे, सदस्य डॉ. ए.के. पाटील, डॉ. रमजान मुजावर , डॉ. सौ. आर. एस. शिंदे , प्रा. डॉ. प्रकाश टोणे यांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस. एम. भोसले यांनी सुएकचे विद्यमान अध्यक्ष डॉ राहुल शं. म्होपरे यांचा कार्यक्रमासाठीचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला.

       यावेळी बोलताना प्रा. दगडे यांनी शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्यानंतर भारतीयांना मिळूनही पूर्ण साक्षरतेचे लक्ष आपण गाठू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना मूलभूत चिंतन केले. महात्मा फुलेंचे चिंतन आजही उपयुक्त असून फुलेंनी मांडलेले प्रश्न आजही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रभर शिक्षणाचे जाळे उभे करून शेतकरी कष्टकरी वर्ग साक्षर केला. कर्मवीरांचे कार्य इतिहासात अधोरेखित करण्यासारखे आहे, असेही प्रा.सुभाष दगडे म्हणाले. 

         अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी साक्षरता आणि देशाचा विकास यांचा सहसंबंध स्पष्ट करताना साक्षरतेचे प्रमाण वाढणे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. भोसले यांनी केले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन खामकर तर आभार प्रा. राम कवितके यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा