Breaking

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

*जयसिंगपूरातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सुभाष बाबूराव अडदंडे यांना सन २०२० चा प्रतिष्ठेचा डॉ.जे.जे.मगदूम समाज भूषण पुरस्कार जाहीर*


प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ. सुभाष अडदंडे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सुप्रसिद्ध धन्वंतरी आणि शैक्षणिक क्षेत्रात उच्च कोटीची कामगिरी करणारे मा.डॉ.सुभाष बाबुराव अडदंडे यांना सन २०२० चा प्रतिष्ठेचा डॉ.जे.जे.मगदूम समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भरत मेडिकल ट्रस्ट च्या वतीने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत घटकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

    या पुरस्काराचे मानकरी डॉ.सुभाष अडदंडे एक प्रगल्भ व कृतिशील विचारांचा पाईक असणारे व्यक्तिमत्व होय.डॉ.अडदंडे यांनी विद्यार्थी दशेपासून सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता दाखवीत त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. आजतागायत वयाच्या 74 व्या वर्षी सामाजिक बांधिलकीसाठी कटीबद्ध असणारी त्यांची ऊर्जा,प्रयत्न ,धडपड व तळमळ अजूनही सुरू आहे. स्वार्थाने बरबटलेल्या या समाजात माता-पितांच्या संस्कारांना परिपूर्ण असणारे व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्य व्रताचं पालन करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी सातत्याने कार्यरत राहणे हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. जयसिंगपूर कॉलेजच्या शैक्षणिक विकासाचा संकल्प करून त्यांनी केजी टू पीजी ही शिक्षण सुविधा निर्माण केली. जयसिंगपूर कॉलेजच्या शिक्षण संकुलात जयसिंगपूर शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी ज्ञानसाधणेसाठी प्रवेशित आहेत. ओपन जिम व स्विमिंग टॅंक सुविधांच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. जयसिंगपूर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीकरण,नँक मानांकनामध्ये उच्च दर्जा, कॅम्पस सुशोभीकरण, बटरफ्लाय गार्डन, नक्षत्र गार्डन, शेतकऱ्यांसाठी प्रायोगिक शेती शाळा, माती व पाणी परीक्षण केंद्र, जयसिंगपूर कॉलेजचा संपूर्ण परिसर विविध वनराईने संतुलित व हिरवळमय करून टाकला आहे.400 मीटर ट्रॅक वरती शेकडो जयसिंगपूरकर वासियांना व्यायामाची सुविधा, शासनाचे व नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांना व सार्वजनिक कार्यक्रमांना कॉलेजमध्ये सुविधा पुरविण्याचा काम करीत असतात.

      सन २००५ व सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात पूरग्रस्त नागरिकांची राहण्याची उत्तम व्यवस्था करून त्यांची भोजनाची व आरोग्याची व्यवस्था त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांना विविध मार्गाद्वारे मदत उपलब्ध करून दिली.तसेच सन २०२० मध्य कोरोना महामारीच्या काळात जयसिंगपूर कॉलेज व शिवार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माजी खासदार मा. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली व मा.डॉ. महावीर अक्कोळे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या  साथीने कोव्हिड केंद्र सुरू करून तत्कालीन काळात  समाजातील सर्व घटकातील लोकांची सेवा करण्याचं कार्य कोविड योद्धा म्हणून त्यांनी समाधानकारकपणे पूर्ण केले.

      स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून कार्य करत असताना पदापेक्षा कार्याला प्राधान्य देऊन त्यांनी आपला सक्रिय सहभाग दाखविला. शेतकरी हित केंद्रबिंदू म्हणून त्यांनी मा.राजू शेट्टींच्या साथीने ऊस व दूध आंदोलनामध्ये ही सहभाग नोंदविला. दुधाला योग्य दर मिळावा यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत स्वतः सहभागी होऊन शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी स्वाभिमानी ऍग्रो दुग्ध  उत्पादक संघाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकरी व ग्राहकांची सेवा करण्याचा मोठं काम त्यांनी केलं आहे. अल्पावधीतच या दुग्ध संघाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करून नावलौकिक मिळवून दिले.

    आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना समाजाबद्दलची असणारी चिंता व प्रश्न याचे निराकरण करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत असताना आजादी का अमृतमहोत्सव या अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमात त्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन विद्यार्थी तरुणांच्या मध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केले आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्त अभियान नृसिंहवाडीपासून  ते प्रयाग चिखली आयोजित केलेल्या बाईक अभियान रॅलीला तसेच किल्ले विशाळगड येथील स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये ही त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवून त्यांनी आर्थिक मदत केली.

    समाजभूषण डॉ.सुभाष अडदंडे हे आज पर्यंत अनेक पुरस्कारानी सन्मानित झाले आहेत. मात्र कालवश  डॉ. जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार डॉ. अडदंडे यांना जाहीर झाल्याने समस्त घटकाच्या मध्ये आनंद निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने डॉ.अडदंडे यांच्या पुढील सामाजिक कार्यास प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,मा. प्राचार्य, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे, समस्त प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी घटकांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

     जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने अभिनंदन व पुढील आरोग्यमय व आनंदी  आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा