![]() |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांची निवड |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा : महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व सर्वसामान्य घटकांना ज्ञानदान करणारी व नावाजलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त विद्यापीठाची स्थापना/निर्मिती झाली. या नव्याने निर्माण झालेल्या विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागाचे प्रथम प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांची निवड झाली आहे.
प्रा.डॉ.अनिलकुमार कृष्णराव वावरे हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्र व रयत शिक्षण संस्थेतील एक परिचयाचे व अर्थशास्त्रातील अग्रगण्य नाव आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर पी.जी.पाटील या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाले.पुनश्च एकदा हे बहुआयामी व्यक्तिमत्व अर्थशास्त्र विभागाच्या एकूणच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ पातळीवर एक वैशिष्ट्यपूर्ण अंगाने सर्वांच्या मनावर ठसले गेलं आहेत.अर्थात प्रथम प्रभारी मानव्यशास्त्र अधिष्ठाता म्हणून डॉ.वावरे यांची निवड होणे हे शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रवासाला व पुढील पिढीला निश्चितच लाभदायक ठरणार आहे.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा प्रवास हा आज शैक्षणिक गुणवत्तेच्या शिखरावरती कधी पोहोचला हे कळलच नाही .शिक्षकाच्या पोटी घेतलेला जन्म खरोखरच डॉ.अनिलकुमार यांनी सार्थक करून दाखविला. माता-पित्याकडून मिळालेली ज्ञानशिदोरी व संस्काराच्या जोरावर त्यांनी आपलं कर्तुत्व सिद्ध करून दाखविले. भिलवडी गावातून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात दुर्देवाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले मात्र आईवडिलांनी दिलेला विश्वास, प्रेरणा व स्वतःची जिद्द,चिकाटी व महत्वकांक्षा याच्या आधारावर अपयशाने खचून न जाता त्यांनी बोर्ड परीक्षेत सुयश मिळविले. त्यानंतर मात्र शैक्षणिक प्रवास बहरत गेला. आणि विद्यापीठाच्या एम. ए. अर्थशास्त्र विषयातून सामाजिक शास्त्रे या विद्या शाखेमध्ये सुवर्णपदक संपादन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चमक दाखवली. विशेष म्हणजे त्यांनी हा शैक्षणिक गुणवत्तेचा टप्पा आपल्या मामाच्या कडे इचलकरंजीला वास्तव्य करून दररोज विद्यापीठाकडे एसटीचा प्रवास करून पूर्ण केला.परंतु सरांची सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता तो एक संघर्षमय प्रवास ठरला आहे.
महाराष्ट्रातील अर्थशास्त्र विषयातील अग्रगण्य व नावाजलेले ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जे.एफ.पाटील व प्रा. डॉ. वसंतराव जुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विषयातील संशोधन व विषयाच्या पूर्णत्वापर्यंतचे ज्ञान संपादन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अर्थशास्त्रीय विषयाची गरीमा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र अर्थशास्त्रज्ञ शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेली संशोधनात्मक व शैक्षणिक कामगिरी गुणवत्तापूर्ण व अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने लाभदायक ठरली आहे.डॉ.अनिलकुमार हे अनेक शैक्षणिक व सामाजिक पुरस्कारानी सन्मानित झाले आहेत. अर्थशास्त्र विषयाबरोबर एक सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपलं स्थान निर्माण केले आहे. विषयाचे परिपूर्ण ज्ञान, उत्तम वक्तृत्व, परिपूर्ण नेतृत्व, मित्रपरिवार व गुरुवर्यांच्याद्वारे त्यांनी आपल्या विषयाच्या अंतिम शिखरापर्यंत भरारी घेण्याचा प्रयत्न केला
डॉ. अनिलकुमार वावरे यांनी कमी वयात अर्थशास्त्रातील शैक्षणिक प्रवासाच्या गुणवत्तेच्या शिखरे पादांक्रात करीत आज ते मानव्यशास्त्र पदाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचून समस्त अर्थशास्त्रीय प्राध्यापक, विद्यार्थी व अर्थशास्त्रीय प्रेमी घटकांना निश्चितच कौतुकास्पद वाटावे अशी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल व पुढील शैक्षणिक वाटचालीस 'जय हिंद न्यूज नेटवर्क' परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा