![]() |
पालक सभेत मार्गदर्शन करताना प्र.प्राचार्य प्रा. डॉ. एन.पी. सावंत |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी आर्ट्स व कॉमर्स विभागात शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा. डॉ. एन.पी. सावंत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.पी.सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय शिक्षण क्षेत्रात शाहू, फुले, आंबेडकर व कर्मवीर यांचे कार्य सर्व क्षेत्राच्या समग्र विकासासाठी उल्लेखनीय असून भारताच्या उभारणीत ते महत्त्वपूर्ण आहे. तसेच सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांचे कार्य सर्व स्त्री जातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. एम.जे.बुरसे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जात असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये एन.एस.सी.सी,स्काऊट व गाईड प्रशिक्षण, वक्तृत्व, निबंध व पोस्टर स्पर्धा यांचे आयोजन तसेच विविध उपक्रम याबाबत माहिती दिली. याप्रसंगी प्रा.बी.ए. पाटील व प्रा.एस.के.पाटील यांनी अकरावी कॉमर्स व आर्ट्स वर्गांची सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार संपन्न झाला. पालकांच्या मनोगतामध्ये महाविद्यालया कडून असलेल्या अपेक्षा तसेच राबविण्यात येत असणाऱ्या कार्यक्रमाची कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.डी.चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.ए. पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा. एस.एस.पाटील , सौ.ए.ए.चौगुले, सौ.एस. व्ही. बस्तवाडे, सौ. कल्पना पाटील व विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा