Breaking

सोमवार, २ जानेवारी, २०२३

*दारुबंदीची चळवळ व्यापक व लोक चळवळ व्हावी ; मा.शेखर जोशी,सहयोगी संपादक, दैनिक सकाळ*


"दारू नको दूध प्या" या उपक्रमाचं आयोजन ; मा. शेखर जोशी मार्गदर्शन करताना


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


भिलवडी : दि. ३१ डिसेंबर येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना , विवेक वाहिनी व आय.क्यू . ए . सी . विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ' दारु नको दुध प्या' या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शेखर जोशी . सहयोगी संपादक , दैनिक सकाळ , सांगली उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे , अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी , मा. संचालक , डॉ. सुनिल वाळवेकर , मा. धनपाल किणीकर , मा. सुकुमार किणीकर ' मा. संजय कदम , सहसचिव , के.डी.पाटील प्रा. डॉ.एस.डी. कदम उपस्थित होते .

        यावेळी प्रमुख पाहुणे शेखर जोशी म्हणाले की , व्यसनाच्या नादी लागून अनेकांचे संसार धुळीला मिळाले , कुटुंबाची वाताहत झाली . कुटुंबाची प्रगती थांबली. दारुमुळे कोणताच फायदा होत नाही . मग अशा प्रकारचे व्यसन सोडले पाहिजे . आज फक्त पुरुषच व्यसन करत नाही तर स्रियांचे प्रमाण वाढत आहे . तरुणाई आज दिवसेंदिवस दारु , गुटखा , तंबाखू ' अफू , गांजा अशा अनेक गोष्टींचे व्यसन केले जात आहे . आज दारू नको दूध प्या अर्थात दारूबंदी ही व्यापक व लोक चळवळ बनली पाहिजे.

     आज मोबाईचे व्यसन इतके जडले आहे . की, मोबाईल शिवाय तरुण जगूच शकत नाही अशी वाईट अवस्था झाली आहे . तरुणांना फक्त दारूचेच व्यसन नाही तर अनेक प्रकारांची व्यसने लागलेली आहेत ही व्यसने सोडाल्याशिवाय देशाची प्रगती होऊच शकत नाही . आज महाविद्यालयीन जीवनामध्ये विविध व्यसनांचे प्रमाण वाढत आहे हा देशापुढील चिंतेचा विषय आहे . आज ही व्यसनाधिनाता कमी करून देशात सुख शांती प्राप्त करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले .

        यावेळी मा. विश्वास चितळे,(अध्यक्ष ,भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी) अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ' ज्या घरात दारूचे व्यसन केले जाते ते घर कधीच प्रगती करू शकत नाही म्हणून /समाजातील सर्वच  घटकांनी व्यसनापासून दूर राहावे असे ते म्हणाले.

      सकाळी ९ वा मा. संजय कदम,मा.डी. के. किणीकर  व सुकुमार किणीकर यांचे उपस्थितीत महाविद्यालयातून व्यसनमुक्ती रॅलीला सुरुवात झाली.ही रॅली दारुबंदी व व्यसन मुक्तीच्या घोषणा देत देत भिलवडीतून ग्रामपचायती जवळच्या मारूती मंदीराजवळ येवून पोहचली व तेथे दारु नको दुध प्या ह्या घोषणा देत ग्रामस्थांना दुध वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

       या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुणांचा परिचय प्रा. डॉ. व्ही.एस. विनोदकर , कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी करून दिला . 

       या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. विजय गाडे यांनी केले तर आभार प्रा. एस.एस. पाटील प्रमुख, विवेक वाहिनी यांनी मानले.यावेळी या कार्यक्रमास कला विभागातील सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनी , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते.

     कॉलेजच्या या समाज विधायक उपक्रमाचे भिलवडी गावातील नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा