![]() |
डॉ. अतिष पाटील मार्गदर्शन करताना,प्राचार्य डॉ.पी.डी.नारे व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : भूगोल या शास्त्रात काळानुरूप नवनवीन अभ्यासघटक समाविष्ट होत आहे. या विषयाची व्याप्ती अधिकाधिक व्यापक होत असल्यामुळे या विषयात रोजगाराच्या व्यापक संधी उपल्बध असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.अतिष पाटील यांनी केले. ते देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स येथे भूगोल विभाग,रोटरॅक्ट क्लब व विवेक वाहिनी विभागाच्या वतीने भूगोल दिनानिमित्त आयोजित "भूगोल विषयातील संधी व आव्हाने" याविषयावर मार्गदर्शन करीत होते.
प्रारंभी भूगोल दिनाची पार्श्वभूमी मांडताना त्यांनी भूगोल विषयातील डॉ.सी.डी. देशपांडे यांचे योगदान स्पष्ट केले तसेच भूगोल दिनामागाची भौगोलिक पार्श्वभूमी ही स्पष्ट केली. भूगोल ही सर्व शास्त्राची जननी असून हे एक प्राचीन असे शास्त्र आहे. कालानुरूप विज्ञान तंत्रज्ञानांतील बदल या विषयाने स्वीकारले व त्यामुळे आज भूगोल हे एक गतिमान शास्त्र बनले आहे. हा बदल विद्यार्थ्यांनीही स्वीकारून भूगोल विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी सदर प्रसंगी केले.
आज भूगोल विषयातील भौगोलिक माहिती प्रणाली (GIS),सुदूर संवेदन (RS) या नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान घेतल्यास अनेक नोकरीच्या संधी उपल्बध आहेत. पर्यटन व प्रवास या क्षेत्रांतही अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा, शिक्षण क्षेत्र, नकाशा तयार करणे,भूमापन, शहर नियोजन,पर्यावरण यासारख्या असंख्य क्षेत्रात भूगोल विषयातील संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या या युगात सकारात्मक राहून या संधीचा वापर करून घ्यावा असे आवाहन त्यांनी सदर प्रसंगी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.डी. नारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील भूगोल शास्त्राचे प्राध्यापक डॉ.रविकिरण कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ.प्रवीण पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रकटीकरण रोटरॅक्टर केशवकुमार माने यांनी केले. तर सुत्रसंचलनाची जबाबदारी प्रा.एफ.एन. पटेल यांनी पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा