![]() |
कोथळीचे सरपंच भरतेश खवाटे स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन करताना |
*प्रा.जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कोथळी येथील मंगेश नगर (मंगोबा माळ) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच भरतेश खवाटे व इतर सदस्यांनीही स्वच्छतेमध्ये सहभाग नोंदविला.
याचे औचित्य साधून कोथळी ग्रामपंचायतिने राष्ट्रीय सेवा योजना जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या कोविड काळामध्ये लाभलेल्या उत्तुंग अशा सहकार्याची एक पोचपावती म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रभाकर माने, डॉ. के. डी खळदकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पुष्पगुच्छ व एक भेटवस्तू देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे आभार व्यक्त करण्यात आले, तसेच कोथळी गावची सुकन्या श्रुती दत्तात्रय यादव हिची राष्ट्रीय सेवा योजनेमधून राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी पथसंंचालनासाठी निवड झाली आहे. तिचाही कोथळी गावच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारी मध्ये कोथळी या गावात कोविड संदर्भात जनजागृती करिता दत्तक गाव म्हणून निवड करण्यात आली होती.या काळामध्ये कोविड संदर्भातील शासनाचे सर्व मार्गदर्शन सूचनाचे व कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेचे सविस्तर माहिती व जनजागृती डिजिटल मीडियाच्या माध्यमातून गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या राष्ट्रीय सेवा योजने कडून करण्यात आले होते,
यावेळी कोथळी गावचे सरपंच भरतेश खवाटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष आभार व्यक्त केले व आपल्या गावामध्ये ही राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे यांनी आपणही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी राहिलो असल्याचे उद्गार काढून राष्ट्रीय सेवा योजना या विभागाकडून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रहित व राष्ट्रीय प्रेम निर्माण केले जाते, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आमच्या गावामध्ये कोविड महामारी मध्ये मिळालेल्या सहकार्याचे आभारही त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी कोथळी हे गाव शिरोळ तालुक्यातील नामांकित व सदन गाव असल्याचे मत व्यक्त करत कोथळी गावामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. तसेच कोथळी गावचे सरपंच व सर्व सदस्यांचे खूप चांगले सहकार्य मिळाले अशी भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मातोश्री सोशल फाउंडेशन अध्यक्ष जीवन आवळे यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे यांनी मांडले या कार्यक्रमास कोथळी गावच्या डेप्युटी राजश्री सुतार, ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, सदस्य शरद कांबळे, सदस्य राजेश विभुते, सदस्य उल्हास पाटील,सदस्य संदिप कांबळे, सदस्य विलास कोरवी यासह प्रा. डॉ.नितीश सावंत,प्रा.डॉ.बी.एम. सरगर, सुनिल पखंडी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा