![]() |
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर, दि. ३१ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभाकरिता पदवी प्रमाणपत्र मागणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वीच्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांना रू.३५०/- शुल्काने अर्ज भरण्याकरिता दि. २९ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज भरण्याकरीता ३५० रुपये शुल्कासह ५ जानेवारी आणि ८५० रुपये विलंब शुल्कासह १० जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकणार आहेत. तरी, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत, त्यांनी या विहीत कालावधीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा