![]() |
सायबर तज्ञ - श्री. विनायक राजाध्यक्ष |
सांगली : येथील श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे बुधवार दिनांक ८ रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विलिंग्डन महाविद्यालय येथे कार्यरत असलेले नामांकित सायबर फॉरेन्सिक तज्ञ व सायबर अभ्यासक श्री. विनायक राजाध्यक्ष यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सायबर क्राईम बद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी श्री राजाध्यक्ष यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ते कसे होतात व त्यापासून कसे वाचायचे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या अशा सूचनाही दिल्या,
१) कोणत्याही वेबसाईटवर आपली संपूर्ण माहिती देऊ नये.
२) अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन चॅटिंग करू नये.
३) खात्रीशीर नसलेले कोणतेही ॲप वापरू नयेत.
३) आपले विविध पासवर्ड सहजासहजी अंदाज करू शकणार नाही असे स्ट्राँग ठेवा.
४) सणासुदीला येणाऱ्या लिंक्स उघडू नका - बहुतांश त्या फसवण्यासाठी बनवलेल्या असतात.
५) भारतीय ऑनलाईन बँकिंग ॲप्स ( भीम, फोन पे ई.) वापरा. गुगल पेला प्राधान्य नको.
६) खात्रीशीर वेबसाईट वरच भेटी द्या. (जिथे HTTPS असा उल्लेख असेल ).
७) आपला फोन चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास पोलिसात तक्रार दाखल करावी. ( कारण तो फोन कोणत्या तरी गुन्ह्यासाठी वापरला जाऊ शकतो )
८) जुने फोन विकत घेणे टाळावे, ( कारण विकानाऱ्याने त्या फोनचा गैरवापर केलेला असू शकतो.)
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे सर लाभले होते. यावेळी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुशील कुमार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ.युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा. श्रीमती गायत्री जाधव, प्रा. श्रीमती वैशाली गायकवाड, प्रा. श्रीमती मुक्ता पाटील, ग्रंथपाल सौ.संध्या यादव व बी.एड प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा