Breaking

शनिवार, १ एप्रिल, २०२३

*अकिवाटच्या सुपुत्राने केली आहे अनेक गावांची सेवा, ग्रामसेवक सचिन भगवान कांबळे यांची यशोगाथा*

 

अकीवाटचे सुपुत्र मा.सचिन कांबळे


पत्रकार आदिनाथ पाटील : अकिवाट


     उपवासाचं महत्त्व प्रत्येक धर्मात सांगितलं आहे. पण अजूनही बरेच लोकं उपवास म्हणजे खण्या पिण्याचा काही वेळेसाठी त्याग असच समजतात. पण तस मुळीच नसून उपवासाचा शब्दश अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे भौतिक गोष्टींचा त्याग करून स्वतःच्या सहवासात राहणे. आजतागायात लोकं फक्त खाण्याबाबतीत उपवास करत होते, पण आता एका वेगळ्या उपवासाची गरज आहे, ते म्हणजे डिजिटल उपवास. म्हणजे मोबाईल आणि TV चा उपवास होय.

ग्रामपंचायतला मिळवून दिलेले पुरस्कार

    कोरोना काळात पालकांसाठी वाईट असणारा मोबाईल हा पुस्तकांपेक्षा जास्त गरजेचा बनला. त्यात मुलांना त्याचं व्यसन लागलं..आणि लागल्याचं प्रौढ लोकांचं अजून बळाला आल. लॉकडाऊनच्या काळात घरात पालकांनाही TV बघण्याशिवाय पर्याय नव्हता.कोरोना गेला पण मोबाईलचं आणि TV च मोठं झालेलं भूत सोडून गेला. मुलं/मुली अजूनही पुस्तक आणि मैदानाऐवजी  मोबाईल मध्ये यूट्यूब, whats aap, facebook आणि Instagram वर गुंतून बसली. युवा पिढी डिजिटल व्यसनाच्या आहारी गेली, ते ही इतकी त्यातून विविध मानसिक आणि शारीरिक रोग बळाला आले. मुलांची शालेय गुणवत्ता घसरली.

       नेमकं ह्याच गोष्टीला डोक्यात घेऊन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मा. डॉ. जितेंद्र दुडी यांनी 'model school: माझी शाळा , आदर्श शाळा' हा प्रोजेक्ट चालू केला. त्यात कडेगाव तालुक्यातील  'मोहीत्यांचे वडगाव ' या गावाचा ही समावेश आहे. त्याच उपक्रमाच्या अनुषंगाने ह्या डिजिटल रोगावर आळा घालण्यासाठी डिजिटल पथ्य पाळायच ठरवलं. याचा प्रयोग मोहीत्याच्या वडगावात करण्यात आला. याच्या अंतर्गत दररोज सायंकाळी 7 ते 8:30 वाजता  गावातील सगळे मोबाईल आणि TV बंद ठेवायचे. 7 वाजता भोंगा वाजला की ह्या डिजिटल उपवासाची वेळ चालू, 8:30 वाजता दुसरा भोंगा वाजला की उपवास बंद. ही संकल्पना गावात राबवण्यात त्या गावचे ग्रामसेवक मा. श्री. सचिन भगवान कांबळे यांचा मोठा वाटा आहे. ही संकल्पना गावातील सरपंच,  उपसरपंच तसेच सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना पटवून देणे, सरपंच विजय मोहते यांच्या सोबत संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन ही संकल्पना गावकऱ्यांना पटवून देणे. अशा प्रकारे त्यांनी एक महत्वाची भूमिका निभावली. सुरवातीला काही जणांच्या कडून या संकल्पने ची चेष्टा झाली, पण महत्त्वकांक्षी ग्रामस्थांच्या जोरावर हा उपक्रम 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिवशी दिवशी चालू झाला आणि आज अखेर हा उपक्रम यशस्वी रित्या चालू आहे. 

         ह्या उपक्रमाला इंग्लिश मध्ये digital detox असे बोलले जाते. या उपक्रमाचा परिणाम असा झाला की 7 चा भोंगा वाजला की सगळी मुले/मुली मोबाईल सोडून अभ्यासाला बसतात. प्रौढ वर्ग मोबाईल आणि TV सोडून काट्यावर येईन गप्पा मारतात. दीड तासासाठी गावात खेळीमेळीचे वातावरण असते. या उपक्रमाने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत झाली. मुलांची शालेय गुणवत्ता वाढली. माणसांशी माणूस जोडला गेला.

    'मोहित्यांचे वडगाव ' या गावात असा काहीतरी उपक्रम राबविला जात आहे ही बातमी प्रकाशाच्या वेगाने संपूर्ण राज्यभरच नाही तर देशभर पसरली. देश सोडा, जगभर पसरली. विविध देशातील News media ने या गावाला भेट देऊन याची माहिती घेतली. अगदी फ्रान्स सारख्या अनेक युरोपीय देशांबरोबरचं, अरेबिक देशांनी ही याची दखल घेऊन आपल्या देशातील मीडियावर ही बातमी झळकली. इंग्लंडच्या BBC वरही बातमी लागली. ह्या गावाकडून प्रेरणा घेऊन आसपास भागातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. 'मोहित्याचे वडगाव ' ह्या गावातील हा digital detox चा उपक्रम अगदी संयुक्त राष्ट्र कमिटील लोकांना ही भावत आहे. गाव आधी पासून आदर्शवत होतच, पण या उपक्रमाने गावाला आंतरराष्ट्रीय ओळख तयार करून दिली आहे. 

     या सर्व प्रवासात सांगली जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. जितेंद्र दूडी, सरपंच मा.विजय मोहिते आणि मूळ अकिवाट गावचे सुपुत्र असलेले  आणि मोहीत्यांचे वडगाव या गावचे ग्रामसेवक असलेले मा. श्री. सचिन भगवान कांबळे याचा फार मोलाचा वाटा आहे. गावातील सर्वोच्च प्रशासशिक माणूस म्हणून सचिन यांनी या उपक्रमात बरोबर गावाच्या शाश्वत मानवी विकासात निर्देशकाची भूमिका बजावली आहे. सचिन हे आधी तडसर या गावात ग्रामसेवक म्हणून रुजू होते. त्या गावात सचिन 2014 ला कार्यरत झाले. तिथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, डिजिटल स्क्रीन, सर्व सोयीनीयुक्त बगीचा इ.अनेक विकास कामे वेगवेगळ्या योजनेंतर्गत केली. गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान-तालुका स्तरीय प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय व्दितीय क्रमांक, स्मार्ट ग्राम- तालुका स्तरीय प्रथम क्रमांक, केंद्र शासनाचा पंडीत दिनदयाळ उपाध्याय पुरस्कार अशी 70 लाख रू. बक्षिसांची रक्कम मिळवून दिली आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात तडसर येथे 100 दिवस शिवछत्रपती कोरोना सेंटर लोकवर्गणीतून चालविले. अशी अनेक लोकोपयोगी कामे करून कर्तव्यतत्पर सेवा बजावली आहे. या सर्व गोष्टींची पोचपावती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी (यशदा) पुणे यांचे मार्फत आयोजित राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी (आसाम राज्य) सचिन यांची विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे कर्मचारी कोट्यातून निवड झाली होती.जाईल तिथे आपलं गाव समजून हा माणूस काम करीत आहे. सचिनचा गावचा सुपुत्र म्हणून समस्त अकिवाटकर नागरिकांना सार्थ अभिमान आहे!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा