Breaking

शनिवार, १ एप्रिल, २०२३

*जयसिंगपूरातील शाहूनगरमध्ये श्री महालक्ष्मी यात्रा प्रसन्न वातावरणात व उत्साहात संपन्न*


शाहूनगर मध्ये श्री महालक्ष्मी यात्रा संपन्न


*विक्रांत माळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  शाहूनगरची वर्धागिंनी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अत्यंत उत्साहात व प्रसन्न वातावरण संपन्न झाली. २८ मार्च २०२३ ते ३० मार्च २०२३ यादरम्यान श्री महालक्ष्मी देवीची यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली. 

     यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी अभिषेक, महापूजा व रात्री वामन गोंधळी यांचा गोंधळ गाण्याचा कार्यक्रम झाला तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक व दुपारी देवीची पालखी मिरवणूक आणि रात्री महाप्रसाद वाटप करण्यात आले, यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वा. भव्य मोटारसायकल बरोबर श्वान पळविणे स्पर्धा घेण्यात आले व रात्री ९ वा. झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मध्ये आनंद द्विगुणीत झाला. अशा तऱ्हेने तीन दिवस यात्रा मोठ्या उत्साहात भरली होती यावेळी असंख्य भाविक भक्तांचे गर्दी दिसून आली.

       यात्रेचे उत्तम नियोजन देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रकाश माळी, यात्रा कमिटी अध्यक्ष पै. विठ्ठलराव मोरे, अर्जुन देशमुख, शैलेश अडके, अजित पवार, प्रकाश घोडके, गुंडाप्पा पवार, अभय माळी, महेश कलकुटगी, पोपट सूर्यवंशी, बबलू नलवडे, संजय पाटील, श्रीपती माळी, सोमनाथ माळी,  गुरुदेव माळी यांच्यासह सर्व सदस्यांनी केली.

      या यात्रेदरम्यान भाविकांच्या मध्ये श्री महालक्ष्मी मातेविषयी अटळ श्रद्धा व प्रचंड उत्साह दिसून आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा