![]() |
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सुभाष अडदंडे, |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे कार्यशील कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्ती कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे, डॉ.महावीर अक्कोळे, मा.पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
सुरुवातीस प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी उपस्थित घटकांचे स्वागत केले. प्रास्ताविकाच्या माध्यमातून संजीव मगदूम यांच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, कामातील नेमकेपणा व जाणतेपणा, कर्तव्याशी प्रामाणिक, सुंदर हस्ताक्षराच्या माध्यमातून इतरांवर प्रभाव पडणारे प्रशासकीय व्यक्तिमत्व होय.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी. सावंत,प्रा.डॉ.बी.एम. सरगर, डॉ.सौ.एस.एस.महाजन,प्रा.डॉ. टी.जी.घाटगे, ए.बी. कांबळे, उपप्राचार्य प्रा.बी.ए.आलदर व डॉ. प्रभाकर माने यांनी डॉ.संजीव मगदूम यांच्या कार्याचा गौरव करणारी विशेष मनोगते व्यक्त केली.
संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवा बजावीत असताना कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांच्याकडे असणारा उत्तम नेतृत्व, कार्य कुशल कर्तृत्व व सेवाभावी दातृत्व याचाही उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला. अत्यंत प्रामाणिक व कार्यक्षमपणे कामाची जबाबदारी हाताळणारा मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचयाचे होते.
सत्काराला उत्तर देताना संजीव मगदूम म्हणाले, महाविद्यालयात रुजू झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा अनुभव हा कुटुंबाप्रमाणे राहिला. डॉ. सुभाष अडदंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक प्रकारचा आनंद, समाधान व काम करण्याची सकारात्मक ऊर्जा मिळत असे. प्रशासकीय काम करत असताना माझ्या सहकार्यानी अर्थात संजय चावरे, सतिश शेटे व इतर सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला. सेवानिवृत्तीनंतर शेतकरी म्हणून कार्य करण्याचा त्यांचा मानस असल्याचे ते बोलले.यावेळी त्यांनी आपलं संस्थे प्रति असलेले दातृत्व दाखवित संस्थेस २१०००/ रुपयांचा धनादेश डॉ.सुभाष अडदंडे व डॉ. महावीर अक्कोळे यांच्याकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम.व्ही.काळे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सुनील चौगुले यांनी केले.
याप्रसंगी संजीव मगदूम यांच्या मातोश्री श्रीमती मगदूम व त्यांची पत्नी सौ. कविता मगदूम, प्राचार्य डॉ.जे.पी.माळी,संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मा.शशांक इंगळे, प्रा.आप्पासाहेब भगाटे , मा.विपुल खाडे व मा.मादनाईक महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी, आजी-माजी प्राध्यापक, नातेवाईक व मगदूम परिवारावर प्रेम करणारे सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा