![]() |
नूतन वित्त व लेखाधिकारी पदी डॉ.सौ. सुहासिनी सरदार पाटील |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नूतन वित्त व लेखाधिकारी पदावर डॉ. सुहासिनी सरदार पाटील नुकत्याच रुजू झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा सेवा विभागाच्या उपसंचालक संवर्गातून डॉ. सुहासिनी पाटील यांची दि. ११ ऑगस्टच्या शासन आदेशाद्वारे शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. दि. १४ ऑगस्ट रोजी डॉ. पाटील यांनी प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी डॉ. पाटील या सांगली येथील कोषागार कार्यालयात कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तत्पूर्वी, त्यांनी कोल्हापूर, सांगली येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम पाहिले आहे. त्यांना या विभागातील कामकाजाचा १५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा प्रदीर्घ कामाचा अनुभव व काम करण्याची विशेष शैली यामुळे निश्चितच विद्यापीठाचे कामकाज सुकर व उत्तम होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा