Breaking

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

*प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी बुबनाळच्या श्री सुधीर शहापुरे यांची निवड*

 

सुधीर शहापूरे यांचा सत्कार करताना सर्व मान्यवर


 *शिरढोण ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार*


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 नृसिंहवाडी : बुबनाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते व समाज कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे श्री सुधीर शहापुरे यांची नुकतीच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड झाली.

   शिरढोण गावामध्ये श्री सुधीर शहापूरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.याप्रसंगी  श्री जयपाल मानगावे, विजय सूर्यवंशी, बिरदेव यंगारे, अजित चौगुले, गोरख सासणे डॉ. कुमार पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

    श्री शहापुरे यांनी माहिती दिली की, या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे,तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह. १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

      या योजनेचा लाभ सर्वच लाभार्थीने घ्यावे यासाठी ते  सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. तसेच तालुक्यातील सर्वच गावांमध्ये  या योजने संदर्भात लोकांच्या जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा