![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात मार्गदर्शन करताना मा.समुपदेशक सत्यजित देसाई |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
कोल्हापूर : मोबाईलचा अतिवापर होत असल्याने नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील समुपदेशक सत्यजित देसाई यांनी व्यक्त केले. एम. ए. मास कम्युनिकेशन विभागात मानसिक आरोग्य या विषयावर ते बोलत होते.
देसाई पुढे म्हणाले, आजच्या काळात माणसाची जीवनशैली अत्यंत धावपळीची झाली असून वाढत्या गरजा, बदलता आहार आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा होणारा जास्त वापर यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. मोबाईलचा अतिरेकी वापर हे एक प्रकारचे व्यसन आहे. मोबाईलच्या सततच्या अमर्याद वापराने चीड-चीड होत असते. अवेळी झोपणे, योग्य आहार न घेणे याचाही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. माणसाच्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा आणि त्यात नेहमी असमाधानी राहण्यामुळे बौद्धिक क्षमतेवर ताण येतो. याचा शरीरावरही प्रतिकूल परिणाम होतो. मानसिक ताणतणाव ही संपूर्ण जगाची गंभीर समस्या बनली आहे. यासाठी माणसांनी एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. आनंदी राहण्यासाठी पुस्तकांचे वाचन आणि प्रवास करायला हवा.
स्वागत मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुमेधा साळुंखे यांनी तर पाहुण्यांची ओळख डॉ. प्रसाद ठाकूर यांनी करून दिली. आभार पत्रकारितेचा विद्यार्थी अक्षय जहागीरदार याने मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा