Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

*भारतीय संविधान एक सामाजिक क्रांतिकारी दस्तऐवज : गट शिक्षणाधिकारी मा. दिपक कामत यांचे प्रतिपादन*


संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे गट शिक्षणाधिकारी मा. दिपक कामत,प्रा.डॉ. प्रभाकर माने, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.डॉ.धनंजय कर्णिक व कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. गौतम ढाले, प्रा.डॉ.वाघमारे, प्रा.डॉ.उमाजी पाटील,कार्यालयीन अधीक्षक मा. मोटे व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय संविधान हे जगातील सर्वोच्च संविधान असून भारतीय संविधान एक सामाजिक क्रांतिकारी दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी मा. दीपक कामत यांनी केले. ते श्रीमती सुशीलादेवी घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर प्रसंगी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे प्रा.डॉ. प्रभाकर माने प्रमुख उपस्थिती मध्ये होते. कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.धनंजय कर्णिक अध्यक्षस्थानी होते.

      मा. कामत पुढे म्हणाले, भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक घटकाला व्यक्ती,भाषण स्वातंत्र्य बहाल केले. आज या देशातील प्रत्येक नागरिकाचे अस्तित्व या संविधानामुळे सुरक्षित आहे. त्यामुळे भविष्यात या देशातील प्रत्येक नागरिकाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी संविधानाचा बचाव केला पाहिजे. आज आपले अधिकार, हक्क व कर्तव्य मिळवण्याचा अधिकार संविधानामुळे शक्य झाले आहे.

    कार्यक्रमाचे पाहुणे प्रा.डॉ. प्रभाकर माने भारतीय संविधानावर भाष्य करताना म्हणाले, आज २६ नोव्हेंबर, १९४९  या वर्षी भारतीय संविधानाला मंजूरी मिळाली. आज भारतीय संविधान दिनअमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. तसेच याचे औचित्य साधून भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करण्यात येत आहे.ते पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकर  व त्यांच्या सर्व साथीदारांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली.डॉ बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास, सामाजिक जीवन व भविष्याचा वेध  संविधानामध्ये प्रकट झालेला आहे. संविधाना मध्ये मूलभूत हक्क व कर्तव्य, इतर तत्त्वांचा समावेश केल्याने प्रत्येक घटकाचे जीवन सुकर बनले आहे.

     विशेष म्हणजे आयोजकांनी दिलेल्या संधीमुळे जयसिंगपूरच्या कै.श्री. राम कृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर चा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी कु. रविराज प्रभाकर माने याने भारतीय संविधानाविषयी भाषण करून उपस्थिताच्या कडून वाहवाह मिळवला.

     यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक म्हणाले, भारतीय संविधान हे या देशाचा सन्मान व अभिमान आहे. डॉ.आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील प्रत्येक घटकाला लोकशाहीच्या माध्यमातून  आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या बलशाही बनवले आहे. त्यामुळेच या देशातील प्रत्येक घटक प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा प्रत्येक नागरिका अभिमान असला पाहिजे.

       प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मा. दीपक कामत यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.तसेच कॉलेजची खेळाडू कु.राठोड हिचा क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

     प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मा. दीपक कामत यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.गौतम ढाले यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वाघमारे यांनी केले.

       या कार्यक्रमास NAAC समन्वय प्रा.डॉ.उमाजी पाटील, प्रा.डॉ. मिणचेकर,प्रा. परशुराम माने व इतर प्राध्यापक त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक मा.मोटे सर,प्रशासकीय कर्मचारी व सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, एन सी सी चे कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा