![]() |
शिरोळ तहसील कार्यालय आयोजित अभिरुप मतदान प्रक्रियेचा अनुभव घेताना विद्यार्थी व मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळ तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तहसील कार्यालयाच्या वतीने जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष समजावणे व इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हाताळणी कार्य एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मांजरे म्हणाले, सक्षम लोकशाही व्यवस्थेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने निवडणूक प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाचे विशेष आभार मानले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे व प्रात्यक्षिका द्वारे प्रशिक्षण घेणे या करिता आज बुधवार दिनांक १७ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून एक दिवशीय शिबिर आयोजित केले होते
या एक दिवशीय शिबिराच्या माध्यमातून देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षणार्थींना मोबाईल व्हॅन स्क्रीन द्वारे जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली.
या प्रसंगी तलाठी स्वप्निल घाटगे यांनी निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती सूत्रबद्ध रीत्या विद्यार्थ्यांना देऊन जागरूक केले. यावेळी कॉलेजच्या १०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे अभिरूप मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला. तर कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेची पूर्णपणे माहिती घेतली.
याप्रसंगी प्रा.डॉ.बी.एम. सरगर, प्रा.आर.डी. तासगावकर, प्रा.अक्षय माने, प्रा.कु.माधुरी कोळी व प्रा.सौ.विश्रांती माने हे उपस्थित होते.
मंडल अधिकारी संजय सुतार, तलाठी स्वप्निल घाटगे, सुधीर मोरे व राकेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच निवडणूक नोडल अधिकारी तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर,डॉ. प्रभाकर माने, कॅम्पस अँबेसिडर भोलू शर्मा, प्रथमेश कोळी, एनएसएस प्रतिनिधी समृद्धी येलाज यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली एक दिवशीय शिबीर यशस्वी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा