![]() |
मार्गदर्शन करताना शिवबालक रविराज माने, प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. गौतम ढाले व अन्य मान्यवर |
*प्रा.बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : घोडावत कन्या महाविद्यालय,जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी कै.श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरचा विद्यार्थी रविराज प्रभाकर माने हे विशेष शिवबालक वक्ते म्हणून उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना कु. रविराज माने म्हणाले, राजमाता जिजाऊनी महाराजांना आत्मनिर्भर व स्वराज्य प्रेम, रयतेचा कल्याण याचे उत्तम संस्कार दिले.महाराजांनी मिळालेल्या उत्तम संस्कार व प्रशिक्षण द्वारे वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वराज्याची निर्मितीची शपथ घेतली. त्यांनी आयुष्यभर रयतेसाठी जगले - रयतेसाठी झुंजले. सर्वसामान्यांसाठी स्वराज्याची निर्मिती केली. आज या देशाला शिवाजी महाराजांच्या कृतिशील विचार व स्वराज्यातील प्रत्येक घटकाचा विशेष करून महिलांची काळजी घेणारा रयतेचा राजा पाहिजे. स्वराज्यात ३५० किल्ले असतानाही एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. सध्या परिस्थितीत आजचा युवक व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच जीवन संपवण्याचा प्रयत्न करीत मात्र शिवरायांनी अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही सकारात्मक विचाराच्या माध्यमातून त्यावर मात करीत रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. हाच आशावाद युवकांनी बळकला छ. शिवरायांनीनिस्वार्थी भावनेने व रयतेला केंद्रबिंदू मानून सातत्याने आपला जीवन संघर्ष रयतेसाठी खर्च केले. आजघडीला आपण शिवचरित्राचे आकलन करून प्राप्त परिस्थितीला अनुसरून शिवविचारांचा जागर केला पाहिजे असे प्रेरणादायी विचार मांडले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. गौतम ढाले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शिव विचारांची माहिती दिली. या कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रा. परशुराम माने यांनी मांडले.
सदर कार्यक्रमास प्रा.डॉ. चंदनशिवे, प्रा.डॉ.पाटील,प्रा. मुजावर,प्रा.गोस्वामी, प्रा. गणू गवस प्रा.सौ. सुर्यवंशी, प्रा. संभाजी कांबळे प्रा. मंगेश जोग, प्रा. प्रमोद हुलवान, प्रा.उत्तम तिवडे , प्रा. सुरज कचरे व अन्य प्राध्यापक व प्रशासकीय सेवक- कर्मचारी उपस्थित होते.
वक्ते शिवबालक रविराज प्रभाकर माने यांस शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील कोळी, वर्गशिक्षिका सौ. अनिता कोळी व गीता प्रभाकर माने यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा