Breaking

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

शिवदृष्टी नेत्र रुग्णालय, मिरज यांच्याकडून श्रावणबाळ वृद्धाश्रमातील वृद्धांचे मोफत तपासणी व ऑपरेशन.


मालोजीराव माने - कार्यकारी संपादक 

शिरोळ : मिरज येथील प्रसिद्ध शिवदृष्टी नेत्र रुग्णालय चे सर्वेसर्वा डॉ. अर्चना बिरादार व त्यांचे सर्व सहकारी डॉ. प्रमोद नागवकर, सोनाली सकटे, सागर पाटील यांनी शिरोळ अकिवाट येथील श्रावण बाळ वृध्दाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व काहींचे ऑपरेशन मोफत करून त्यांना नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे. 

    ही वैद्यकीय मदत करून सामाजिक सेवेचं उत्तम उदाहरण त्यांनी समाजाला दिलं आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

      यासाठी श्रावणबाळ वृद्धाश्रमाच्या संचालिका शोभाताई पानधारे, महावीर मगदूम, शिवाजी कोळी, राहुल कोळी, औरंग चाचा मुजावर व इतर संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.



    तसेच या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सर्व टेस्ट मोफत देण्याचं काम गणेश क्लिनिकल लॅबोरेटरी, कुरुंदवाड यांनी केल्याबद्दल डॉ. तेरवाडे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचेही वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा