![]() |
मयत नितीन रवींद्र मनकट्टे, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील ५२ झोपडपट्टी मधील नितीन रवींद्र मनकट्टे (वय वर्ष १५) या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची वर्दी अक्षय राजू माने, जयसिंगपूर यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २७ मे,२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास मयत नितीन मनकट्टे हा युवक आपल्या ३ ते ४ मित्रांसोबत आंघोळी करिता धरणगुत्ती हद्दीतील कृष्णा हॉलच्या पाठीमागे असलेल्या विहिरीमध्ये मित्रासोबत आंघोळ करीत असताना विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेने जयसिंगपुरातील छ.संभाजीनगर व ५२ झोपडपट्टी, परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.अधिक तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल वारके करीत आहेत.
वजीर रेस्क्यू फोर्सला सदर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा