![]() |
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ.राजमल जैन, अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
*भारतीय अवकाश संशोधनाला गती देण्यासाठी व्याख्यानाचा आयोजन*
जयसिंगपूर : “भारतातील अंतराळ संशोधन हे केवळ वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक नसून आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा भक्कम पाया आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ व रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी (इंग्लंड) चे मानद फेलो प्रा. राजमल जैन यांनी केले. ते जयसिंगपूर कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘भारतीय आणि अवकाश’ या विषयावरील आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. गुरुवार, २१,२०२५ रोजी कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.
शास्त्रज्ञ प्रा. जैन यांनी इस्रोच्या स्थापनेपासून चांद्रयान-१, चांद्रयान-२, मंगळयान, आदित्य-एल१ व चांद्रयान-३ या मोहिमांचा आढावा घेत आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताने घेतलेल्या झपाट्याने प्रगतीचा गौरव केला. जीएसएलव्ही व पीएसएलव्ही या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण प्रणालींच्या उल्लेखाने भारताच्या अवकाश क्षेत्रातील किफायतशीरतेची वैशिष्ट्ये त्यांनी अधोरेखित केली.
“विक्रम साराभाई यांच्या द्रष्ट्या विचारातून भारताने अंतराळ संशोधनात जागतिक पातळीवर ठसा उमटविला आहे. साधनांची मर्यादा असूनही, दृढ वैज्ञानिक दृष्टिकोन, सातत्य व आत्मनिर्भरतेच्या बळावर भारत जागतिक स्तरावर पोहोचला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पृथ्वी व सूर्य यांच्यातील परस्पर संबंधाचे वैज्ञानिक परिमाण विशद करताना, त्यांनी सांगितले की हे नाते सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. महावीर अक्कोळे यांनी आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे होणारे फायदे तसेच संभाव्य जोखमीबाबत सजग राहण्याची गरज अधोरेखित केली.
प्रा.डॉ. प्रशांत चिकोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. रवींद्र माने व प्रा.डॉ. स्मिता महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुजाता पाटील यांनी केले.
या वेळी कॉलेजमधील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा