![]() |
आरोपीसह शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व गुन्हा शोध पथक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका वाहनचोरास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत केली. पुढील चौकशीत त्याच्याकडून जेसीबी चोरीचाही गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि.०३ सप्टेंबर रोजी हरीशचंद्र भाऊसो कांरडे यांच्या फिर्यादीवरून शिरोळ पोलीस ठाण्यात स्प्लेंडर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर तपास श्रेणी पोसई नाईक हे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते. दि.०७ सप्टेंबर रोजी नांदणी-माणगावेवाडी रोडवर संशयीतरीत्या फिरत असलेला इसम पोलिसांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील KA-32-EF-4429 ही मोटारसायकल विषयी चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले नाव मलीकसाब नबीसाब यरनाळ (वय ३४, मुळ रा. भैरववाडगी, ता. देवरहिप्परगी, जि. विजयपूर, कर्नाटक. सध्या रा. नांदणी, ता. शिरोळ) असे सांगून दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरोळ-धरणगुत्ती रोडवरून हिरो स्प्लेंडर प्लस (MH-10-BS-1840) मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी लपविण्यासाठी त्याने कर्नाटक क्रमांकाची बनावट नंबर प्लेट (KA-32-EF-4429) लावल्याचेही मान्य केले. सदर मोटारसायकल हीच फिर्यादीची असल्याचे पोलिसांनी खात्री केली.
याच आरोपीकडून पुढील तपासादरम्यान आणखी एक जेसीबी चोरी केल्याचा खुलासा झाला. ही जेसीबी देखील पोलिसांनी हस्तगत केली असून या गुन्ह्याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि.१० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तपास श्रेणी पोसई नाईक करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा