![]() |
| प्रमुख वक्ते प्रा. स्नेहल रोटे मार्गदर्शन करताना, सोबत उपप्राचार्य प्रा. डॉ.विजयमाला चौगुले व अन्य मान्यवर |
*प्रा. सौ. विश्रांती माने : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. स्नेहल रोटे व अध्यक्षस्थानी मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होत्या.
यावेळी प्रा. स्नेहल रोटे यांनी 'भारतीय लोकसंख्या : भविष्यकालीन विकासाचे द्योतक' या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आज केवळ राज्यकर्त्यांबरोबर धोरणकर्ते आणि जागृत नागरिक ही अधिक महत्त्वाचे आहेत. वाढती लोकसंख्या ही योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींशी जोडल्यास देशासाठी ओझे न ठरता भविष्यकालीन आर्थिक विकासाची मोठी ताकद ठरू शकते.
उपप्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, लोकसंख्या ही देशाची संपत्ती आहे, परंतु तिचे सुयोग्य व्यवस्थापन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, देशाचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. विश्रांती माने यांनी केले, तर आभार प्रा.भक्ती सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना देवकर यांनी केले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. सुजाता पाटील, प्रा.मेहबूब मुजावर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा